Arvind Kejriwal Sakal
देश

उत्तराखंडमध्ये 'आप'चे सरकार आल्यास स्थानिकांना 80 टक्के आरक्षण

उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

ओमकार वाबळे

उत्तराखंडमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आम आदमी पार्टीने कंबर कसायला सुरुवात केली आहे. यासाठी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला आहे. उत्तराखंडमध्ये आपचे सरकार आल्यास एक लाख स्थानिकांना नव्या नोकऱ्या उपलब्ध करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. त्यांनी आज देहरादूनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकार आल्यास एक लाख लोकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले.

काय म्हणाले केजरीवाल?

देहरादूनमध्ये महत्वाच्या सहा घोषणा करण्यासाठी आल्याचे केजरीवाल म्हणाले. अरविंद केजरीवाल यांच्या मते, जर आप या निवडणुकांमध्ये विजयी झाली तर प्रत्येक घराला रोजगार मिळेल.

6 महिन्यांत एक लाख सरकारी नोकऱ्या निर्माण होतील. तुम्हाला रोजगार मिळेपर्यंत दरमहा पाच हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला जाईल. सामान्य माणसांनी दिलेल्या आश्वासनांमध्ये उत्तराखंडातील नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण देण्यात येईल, असे केजरीवाल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT