Himanta Biswa Sarma 
देश

आसाममध्ये मोठा निर्णय! मुस्लीम विवाह कायदा रद्द; 89 वर्षे जुना कायदा नेमका काय होता? जाणून घ्या

Assam Muslim Marriages and Divorces Registration Act : देशात समान नागरिक कायद्याचे (UCC) वारे वाहून लागले आहेत. उत्तराखंडनंतर आता आसामने देखील या कायद्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात समान नागरिक कायद्याचे (UCC) वारे वाहून लागले आहेत. उत्तराखंडनंतर आता आसामने देखील या कायद्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांच्या मंत्रिमंडळाने मुस्लीम कायद्या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणीच्या संदर्भात असलेल्या ८९ वर्ष जुन्या कायद्याला रद्द करण्याचा आसाम सरकारने निर्णय घेतला आहे. Assam CM Himanta Biswa Sarma repeal the age old Assam Muslim Marriages and Divorces Registration Act

मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी एक्सवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मुस्लील विवाह आणि घटस्फोट नोंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. या कायद्याने मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ होण्यापूर्वी देखील वधू-वराला विवाह करण्याची परवानगी देण्यात येत होती. बालविवाह रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ म्हणालेत की, राज्यात समान नागरिक कायदा लागू केला जाईल हे मुख्यमंत्री शर्मा यांनी याआधीच जाहीर केले आहे. शुक्रवारी मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा, १९३५ (Muslim Marriages and Divorces Registration Act) रद्द करण्याचा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काय होता कायदा?

विवाह आणि घटस्फोट नोंदणीसाठी मुस्लीम समाजासाठी एक वेगळा कायदा होता. ९४ अधिकृत व्यक्ती या कायद्याअंतर्गत विवाह आणि घटस्फोट नोंदणी करु शकत होते. त्यांचे अधिकार आता संपुष्टात आणण्यात आलेत. शिवाय त्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात आलेत. सरकारने हा कायदा रद्द केल्याने आता सर्व विवाह एकाच कायद्याच्या छत्राखाली आले आहेत.

ब्रिटिश काळात मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नियमनासाठी हा कायदा करण्यात आला होता. सध्याच्या स्थितीला तो लागू होत नाही. या कायद्याची मदत घेऊन कमी वयाचे मुस्लीम मुलं-मुलींचे विवाह नोंदणी केले जात होते. बालविवाह बंदीच्या भूमिकेला हे विरोधाभासी होते. दरम्यान, आसाम सरकारने राज्यात समान नागरिक कायदा लागू करण्याची तयारी सुरु केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT