Assembly Election 2023  sakal
देश

MP Assembly Election : काँग्रेस मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकणार? २२ मतदारसंघांत अल्पसंख्याकांची मते निर्णायक

पीटीआय

भोपाळ : मध्य प्रदेशात पुढील महिन्यात होणारी विधानसभा निवडणूक ही प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये होणार आहे. उत्तर प्रदेश किंवा बिहारप्रमाणे येथे मुस्लिम मतांची टक्केवारी ही तुलनेने कमी असली तरी येथील किमान २२ जागांवर तरी मुस्लिम मते निर्णायक ठरू शकतात.

मध्यप्रदेशात २०१८च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मतांचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांनी वाढल्याने अटीतटीच्या लढतीत काँग्रेस थोड्या फरकाने भाजपच्या पुढे गेला, असे प्रतिपादन मध्य प्रदेश मुस्लिम विकास परिषदेचे निमंत्रक आणि काँग्रेसचे नेते महंमद माहीर यांनी केला आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी २०१८मध्ये सांगितले होते की, जर अल्पसंख्याकांची मते काँग्रेसला मिळाली तर काँग्रेस येथे सत्ता स्थापन करेल आणि कमलनाथ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील मुस्लिमांनी एकगठ्ठा मते काँग्रेसला दिली आणि यामुळे २००८ आणि २००१३४मध्ये पराभव झालेल्या जागांपैकी १० ते १२ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, असेही माहीर यांनी सांगितले.

विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मतांचा टक्का हा काँग्रेसच्या तुलनेत अधिक होता. असे असूनही त्या निवडणुकीनंतर आमदारांच्या संख्याबळाच्याबाबतीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

२०११मधील जनगणनेनुसार मध्य प्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या ही साधारण सात टक्के होती. ती आता वाढून साधार दहा टक्क्यांपर्यंत गेली असल्याचे गृहीत धरले तरी मध्य प्रदेशातील ४७ विधानसभा मतदार संघांत मुस्लिम मतांचे प्रमाण हे लक्षणीय असून २२ मतदार संघांत ते निर्णय आहे, असा दावा माहीर यांनी केला आहे. माहीरांच्या दाव्या नुसार मध्य प्रदेशातील जनता ही भाजप सरकारच्या कारभाराला वैतागले तेव्हा ती भाजपचे सरकार पाडते, परंतु येथील काँग्रेसचे मतदार ज्यांच्यामध्ये मुस्लिमेतरांचा देखील समावेश होतो, ते मात्र कधीही काँग्रेसपासून दूर जात नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये विजय निश्‍चित करण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या पारंपरिक मतदात्यांवर अधिक लक्ष देणे आवश्‍यक आहे.

भाजपचा आरोप

मध्य प्रदेश वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेशचे भाजपचे प्रवक्ते सनवर पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ‘‘काँग्रेसने मागील ५३ वर्षांत अल्पसंख्याकांची फसवणूक केली असून अल्पसंख्याकांसाठी काहीही केलेले नाही,’’ असा आरोप त्यांनी केला आहे. याउलट भाजपने अल्पसंख्याकांना राजकारणात पुरेसे प्रतिनिधित्व दिले आहे, त्याचप्रमाणे त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठीदेखील विविध योजना राबविल्या आहेत, असा दावाही पटेल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT