pm modi  sakal
देश

Assembly Elections : पंतप्रधान मोदींच्या झंझावाताला लगाम; पाच विधानसभा निवडणूक; सभांमध्ये सहभागाची संख्या कमी

पाच राज्यांच्या मतदानाचा पहिला टप्पा येत्या ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - प्रत्येक विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा झंझावात लावत होते. यावेळी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारांमध्ये मात्र पंतप्रधान मोदी यांचा प्रचारातील सहभाग कमी झालेला दिसून येत आहे. यामुळे पंतप्रधानांनी प्रचाराला लगाम लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाच राज्यांच्या मतदानाचा पहिला टप्पा येत्या ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी मिझोराम व छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त २० विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जवळपास एक महिना या राज्यात निवडणूक प्रचार केला नाही. आज, गुरुवारला त्यांनी आज छत्तीसगडमधील कांकेर येथे जाहीर सभा घेतली. गेल्या ३० सप्टेंबरला पंतप्रधानांनी छत्तीसगडमध्ये प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज तेथे भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. कांकेरमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान आहे.

राजस्थानमध्ये सुद्धा पंतप्रधान जवळपास एक महिन्यापासून गेलेले नाहीत. गेल्या ३ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये प्रचारात भाग घेतला नाही. तेथे येत्या २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यात मतदान होणाऱ्या तेलंगणात त्यांनी मागची सभा १ ऑक्टोबरला घेतली होती. त्यानंतर ते तेथे प्रचारासाठी गेले नाहीत. काही दिवसांपूर्वी ते मध्यप्रदेशात गेले होते, परंतु त्यांनी सिंधिया स्कूलच्या स्थापनेला १२५ वर्षे झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता व तसेच भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते.

दुसऱ्या टप्प्यात अधिक सभा

गेल्या ९ वर्षांमध्ये प्रत्येक राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा चेहरा समोर करून भाजप निवडणूक लढवित आहे. परंतु यावेळी प्रथमच पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचा व वक्तृत्वाचा भाजपच्या प्रचारात उपयोग कमी प्रमाणात केला जात आहे. मतदानाचा दुसरा टप्पा येत्या १७ नोव्हेंबरला असून यावेळी मध्य प्रदेशातील २३० व छत्तीसगडच्या उर्वरित ७० मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळेल, असे आता बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT