Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ayodhya Ram Mandir : गोड हास्य, भाळी टिळा... रामलल्लाचं मुखदर्शन पहिल्यांदाच! पूर्ण छायाचित्र आलं समोर

अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीची दृष्य समोर आलेली आहेत. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत.

संतोष कानडे

Ayodhya ram temple : अयोध्या येथील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या मूर्तीची दृष्य समोर आलेली आहेत. काळ्या पाषाणतल्या मूर्तीचे फोटो माध्यमांमध्ये झळकले आहेत.

म्हैसुरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, तीनपैकी एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

''रामलल्लाच्या उर्वरित दोन मूर्ती मंदिराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येतील. मंदिराचा पहिला मजला तयार होताच दुसऱ्या मूर्तीची विधीवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली जाईल आणि त्यानंतर शेवटच्या मजल्यावर तिसरी मूर्ती स्थापित केली जाईल.''

अयोध्येतील राम मंदिरासाठी तीन कलाकारांनी तीन मूर्ती साकारल्या होत्या. राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने कर्नाटक येथील शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड केली. २२ जानेवारी रोजी मंदिरातील गर्भागृहात याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल.

ज्या मूर्तीची २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या मूर्तीचं पूर्ण छायाचित्र आता समोर आलेलं आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती अत्यंत सुंदर आहे. चेहऱ्यावर गोड हास्य आहे आणि भाळी टिळा लावलेले रामलल्ला मनमोहक दिसत आहेत.

रामलल्लाच्या तिनही मूर्ती मुंबईतील प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामथ यांच्या रेखाटनावर आधारित आहेत. त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टला रामलल्लाचे पेन्सिल स्केच सादर केले होते. त्यावर आधारित मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Paper Leak: 'पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही'; PM मोदींची मोठी घोषणा, कठोर कायदा आणणार; व्हिडिओ संदेशात नेमकं काय सांगितलं?

Government talks CJP : सोनम वांगचुकनी उपोषण सोडल्यानंतर मोठी घडामोड! कॉकरोच जनता पार्टीसोबत सरकार चर्चेला तयार, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चेनंतर २६ दिवसांनी सोनम वांगचुक यांनी सोडलं उपोषण

Spinach Cheese Sweet Corn Mini Paratha: मुलांच्या डब्यासाठी बेस्ट! पालक-चीज-स्वीट कॉर्नचे मिनी पराठे एकदा नक्की ट्राय करा

सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, दिल्लीत मध्यरात्री घडामोडी; जेपी नड्डांनी रुग्णालयात भेट घेतल्यानंतर निर्णय

SCROLL FOR NEXT