Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ayodhya Ram Mandir : व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतेय प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाची खोटी लिंक; एक क्लिक पडेल महागात

अयोध्येत सोमवारी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही ठगांकडून बनावट लिंक तयार करण्यात आलेल्या आहेत. या लिंकमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

संतोष कानडे

अयोध्याः अयोध्येत सोमवारी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी काही ठगांकडून बनावट लिंक तयार करण्यात आलेल्या आहेत. या लिंकमुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. यासंदर्भात गृह मंत्रालयानेही अलर्ट दिलेला आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंगच्या नावावर सायबर गुन्हेगार बनावट लिंक देऊन फसवणूक करु शकतात. त्यामुळे तुम्हाला whatsapp मेसेज आल्यानंतर त्या लिंकसंदर्भात खात्री करणं गरजेचं आहे. 'एका क्लिकवर पाहा राम मंदिर सोहळा लाईव्ह' असा बनावट मेसेज येण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, MHA सायबर विंगने एक अलर्ट जारी केला असून सायबर विभागाला तशा फेक लिंकची माहिती मिळाली आहे. यामध्ये गुन्हेगार चुना लावण्यासाठी WhatsAppवर फेक लिंक पाठवत आहेत. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

मोबाईलच हॅक होण्याचा धोका

राम मंदिर सोहळ्याची लाईव्ह स्टीमिंग बघण्यासाठी बनावट लिंकवर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलमधील सेन्सेटिव्ह डेटा चोरी होऊ शकतो. तसेच बँक अकाऊंट अप्लिकेशन किंवा वॉलेट App हॅक होऊ शकतं. त्यानंतर अकाऊंटवरील पैसे झीरो होऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.

अशा पद्धतीने कुणाची फसवणूक झालीच तर सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर कॉल करणं गरजेचं आहे. त्यानंतर हे प्रकरण नोंद होईल आणि पुढे तपास होऊ शकेल. मोबाईलधारकांनी अनोळखी नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करणं टाळावं. एखाद्या ओळखीतल्याने जरी लिंक पाठवली तरी त्याची खातरजमा केल्याशिवाय लिंकवर क्लिक करु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

मुलीला १०६ ताप, पैशांसाठी घरातल्यांकडे भीक मागावी लागली... वैशाली माडेने सांगितला तो दिवस; म्हणाली- मी पूर्णपणे बदलले

SCROLL FOR NEXT