Ayodhya Ram Mandir News  
देश

Ayodhya Ram Mandir News: राम दर्शनाच्या आशेने भाविकांची अयोध्येत गर्दी, बेशिस्त जमावाला लाठ्यांचा प्रसाद...

अयोध्येतील मंदिरात काल (सोमवार) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान आज (बुधवार) रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली.

Sandip Kapde

Ayodhya Ram Mandir News:

अयोध्येतील मंदिरात काल (सोमवार) रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान आज (बुधवार) रामलल्लाच्या दर्शनासाठी रामभक्तांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी रामभक्तांना नियंत्रिक करण्याचे प्रयत्न केले पण मात्र भाविकांच्या संख्या मोठ्या संख्येने असल्यामुळे चेंगाचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलीस आयुक्त, महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी लाऊडस्पीकर हातात घेऊन भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर काही वेळाने पोलीस महासंचालक प्रशांत कूमार आणि प्रधान सचिव गृह संजय प्रसाद हेही राममंदिरात पोहचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली.  प्रचंड गर्दी पाहता इतर जिल्ह्यातून अयोध्येकडे येणाऱ्या मार्गांवरूनही वाहने थांबवली जात आहेत. अयोध्येतील प्रचंड गर्दी झाल्यामुळे भाविकांना दुसऱ्या दिवशी दर्शनाला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Ayodhya Ram Mandir News in Marathi)

अयोध्येत पाचशे मीटर अंतरावर तीन विभागात बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.मात्र जमावाच्या दबावाखाली हे गेट तोडले. त्यामुळे अनेक भाविकच नव्हे तर पोलीस कर्मचारीही जखमी झाले.भाविकांनी बॅरिकेडिंग ओलांडून आत प्रवेश केल्यावर सकाळी 11.30 वाजता आरतीसाठी मंदिरातील दर्शन काही काळ थांबवण्यात आले, मात्र गर्दी कायम राहिल्याने पुन्हा दर्शन सुरू करण्यात आले.

2 वाजण्याच्या सुमारास आतील आणि बाहेरील भाविकांची प्रचंड गर्दी नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला.भाविकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आणि हवेत लाठीमार केला.यामुळे चेंगराचेंगरीही झाली आणि अनेक लोक घसरून जखमी झाले.गर्दीत अडकलेल्या काही वृद्ध महिलांना पोलिसांनी कसेबसे बाहेर काढले.

दरम्यान, अयोध्येत आज सुमारे अडीच ते तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तितक्याच संख्येने भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत असून, भाविकांना अखंड दर्शन मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी 8000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि  पोलीस महासंचालक प्रशांत कुमार परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राम मंदिराच्या आत उपस्थित आहेत. (Latest Marathi News)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. कारण राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीचे नियोजन न केल्याने योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर नाराज आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT