Ayodhya Ram Mandir esakal
देश

Ayodhya Ram Mandir : 'अयोध्येतील मोहीम फत्ते, आता लक्ष्य काशी-मथुरा', वकील हरी शंकर जैन म्हणाले...

अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहात रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून रामजन्मभूमीचा लढा सुरु होता.

संतोष कानडे

अयोध्याः अयोध्येमध्ये मोठ्या उत्साहात रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून रामजन्मभूमीचा लढा सुरु होता. भाजप सरकारच्या काळात या लढ्याला यश आलं असून मंदिरदेखील उभं राहिलं आहे. याचंसदर्भात मंदिर प्रकरणातील वकील हरी शंकर जैन यांनी बोलताना पुढच्या लढ्याचं सूतोवाच केलं आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येत मोठी तयारी सुरु झालेली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी प्राणप्रतिष्ठेच्या विधींना सुरुवात होईल. त्यापूर्वीच रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. रविवारी दिल्लीतून अयोध्येकडे विमानाने निघालेले काशी-विश्वनाथ केसचे वकील हरी शंकर जैन यांनी 'आज तक'शी संवाद साधला.

जैन म्हणाले की, काशी-मथुरामध्ये २०२९ पर्यंत मोठं मंदिर उभारलं जाणार आहे. हिंदू भावना ज्वलंत झालेल्या आहेत. इतिहासात जेवढी मंदिर पाडली गेली होती ती सगळी मंदिर उभारणीचं काम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. आरएसएसचं काम हिंदू भावनांना शांत करण्याचं आहे. परंतु आता हिंदुंच्या भावना उग्र झालेल्या आहेत.

हरी शंकर जैन म्हणाले की, एक एक करुन सगळ्या मंदिरांचं निर्माण होणार आहे. जसे पाडले गेले तसे बांधले जातील. काशी आणि मथुरेमध्ये मंदिर निर्माण आंदोलन सुरु आहे. २०२९ पूर्वी मोदींच्या हस्ते काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा शिलान्यास आणि उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल.

दरम्यान, अयोध्येमध्ये निमंत्रित मान्यवर पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. क्रिकेटर रवींद्र जडेजा, योगगुरू रामदेव बाबा, पीटी उषा, अभिनेत्री कंगना रणौत, संगीतकार अनु मलिक आदींसह अनेकजण अयोध्येत दाखल झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT