Bageshwar Dham Maharaj  esakal
देश

Bageshwar Dham : कोरोना किंवा दहशतवादी हल्ल्याबद्दल का सांगितलं नव्हतं? धीरेंद्र शास्त्रींनी दिलं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

Bageshwar Dham Dhirendra Shashtri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री मागच्या काही दिवसांपासून टीव्ही आणि इंटरनेटवर चर्चेत आहेत. हे महाराज लोकांकडून कुठलीही माहिती न घेता त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्याचं समाधानही करतात, असा दावा केला जात आहे.

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशासाठी काही केलं का? असा प्रश्न विचारण्यात आला. 'आज तक'ने त्यांची मुलाखत घेतली आहे. तुम्ही कोरोना महामारी येणार किंवा दहशतवादी हल्ल्याविषयी माहिती देऊन देशाची मदत केली का? असे प्रश्न विचारण्यात आले.

या प्रश्नांवर बाबा म्हणाले की, मी कोणी भविष्यकार नाही की ज्योतिषाचार्य नाही. परंतु जेव्हा कुणी दरबारामध्ये प्रश्न घेऊन येतात तेव्हा मी माझ्या आतली प्रेरणा आणि अनुभूतींवरुन समस्यांचं समाधान करतो. जेव्हा एखादा राजकीय नेता माझ्याकडे येतो आणि राज्याविषयी प्रश्न विचारतो तेव्हा मी योगायोग आणि संभाव्यता सांगतो. परंतु कुणी काही मागणं मांडणार नसेल तर प्रश्न सुटतील तरी कसे?, असं ते म्हणाले.

शास्त्री पुढे म्हणाले की, कुणी काही विचारणारच नसेल आणि मीच स्वतःहून संभाव्य समस्यांबद्दल सांगत गेलो तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. असंही विश्व कल्याणाची कामना आम्ही प्रत्येक दिवशी करत असतोच.

महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये बागेश्वर धाम सरकार नावाने प्रसिद्ध असलेल्या धीमेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 'श्रीराम चरित्र-चर्चा' याचं पठन केलं होतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शास्त्रींवर जादू-टोना आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा आरोप केला आहे. समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी यासंदर्भात आक्षेप घेतले आहेत.

दरम्यान, 'आज तक'च्या मुलाखतीमध्ये धीमेंद्र शास्त्री यांना पठाण सिनेमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासाठी दरबारामध्ये कुणी मागणं मागितलं होतं का? यावर शास्त्री म्हणाले की, असं मागणं कुणीही केलेलं नाही. पठाण चित्रपटात भगव्या रंगाला 'बेशर्म रंग' म्हटलं गेल्याने निषेध नोंदवला असल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT