BJP MLA Munirathna esakal
देश

बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या भाजप आमदाराला सशर्त जामीन मंजूर; कारागृहातून बाहेर पडताना केली होती अटक

BJP MLA Munirathna : पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदार नष्ट न करणे, पुराव्यावर परिणाम न करणे आदी अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रामनगर जिल्ह्यातील काग्गलीपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एसआयटी अधिकाऱ्यांनी मुनीरत्न यांना अटक केली होती.

बंगळूर : बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले भाजप आमदार मुनीरत्न (BJP MLA Munirathna) यांना बंगळूरच्या विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाने (Bangalore Court) जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी राखून ठेवलेला निकाल देताना न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी मुनीरत्न यांना सशर्त जामीन मंजूर केला.

पोलिस तपासात सहकार्य करणे, साक्षीदार नष्ट न करणे, पुराव्यावर परिणाम न करणे आदी अटी त्यांना घालण्यात आल्या असून, दोन जामीनदार मागितले आहेत. रामनगर जिल्ह्यातील काग्गलीपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एसआयटी अधिकाऱ्यांनी मुनीरत्न यांना अटक केली होती. मुनीरत्न यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेने केली होती.

राज्य सरकारने हे प्रकरण एसआयटीकडे सोपवले होते. बीबीएमपीच्या कंत्राटदाराला जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुनीरत्न यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांना आधी जामीन मिळाला; परंतु कारागृहातून बाहेर पडताना पुन्हा अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT