देश

BBC Documentary Row : बीबीसीवर बंदी घालण्यास नकार; SC ने फेटाळली हिंदू सेना अध्यक्षांची याचिका

सकाळ डिजिटल टीम

BBC Documentry Row : हिंदू सेनेच्या अध्यक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हिंदू सेनेच्या अध्यक्षांनी गुजरात दंगलीतील पंतप्रधानांच्या कथित भूमिकेवर आधारित माहितीपट प्रसारित करण्यासाठी बीबीसी आणि बीबीसी इंडियावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

याबाबत हिंदू सेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. त्यात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका फेटाळून लावली आहे.

हिंदू सेनेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने ‘आमचा वेळ वाया घालवू नका’ अशी टीकादेखील केली आहे. या याचिकेत हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही आणि ती सुनावणीयोग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (BBC) 2002 च्या गुजरात दंगलीत पंतप्रधान मोदींवर एक माहितीपट प्रसारित केला होती. ज्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

त्यानंतर हिंदू सेनेच्या अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि बिरेंद्र कुमार सिंग यांनी बीबीसी आणि बीबीसी इंडियावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

याशिवाय अधिवक्ता बरुण कुमार सिन्हा यांच्यामार्फत दाखल याचिकेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला भारतविरोधी डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.

तसेच बीबीसीवर स्वतःचा अजेंडा चालवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. बीबीसी भारतातील शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणत असल्याचा दावादेखील या याचिकेत करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT