Corona positive sakal media
देश

बेंगळुरूचे ऑमिक्रॉनमधून बरे झालेले डॉक्टर पुन्हा पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

बेंगळुरू : सध्या जगभरात पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट पसरले आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंटमुळे सगळीकडे काळजीचे वातावरण असून या दरम्यान आज आलेल्या एका रिपोर्टनुसार, बंगळुरूचे डॉक्टर, ज्यांना कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली होती आणि ते त्यामधून बरे झाले होते त्यांची कोरोना टेस्ट पुन्हा पॉझिटीव्ह आली आहे.

हे 46 वर्षीय डॉक्टर, ज्यांनी कुठलाही परदेश प्रवास केलेला नाही, ते देशात ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या पहिल्या दोन लोकांपैकी एक आहेत. दुसरा रुग्ण हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता, ज्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते आणि नंतर तो देशाबागेर दुबईला निघून गेला होता. ज्या डॉक्टरला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली होती तो पुन्हा एकदा कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आढळले असल्याचे बेंगळुरू महानगरपालीकेच्या (BBMP) अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. तसेच या डॉक्टरांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे आणि त्यांना कुठलीही लक्षणे नाहीत अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी सांगितले की, शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करणार्‍या डॉक्टरला 21 नोव्हेंबर रोजी ताप आणि अंगदुखीचा त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याचे सीटी व्हॅल्यू कमी असल्याने त्याचा नमूने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये व्हायरल लोड हाय असल्याचे दिसून आले.

हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह आढळण्यापुर्वी एक दिवस आधी बेंगळुरू येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित होते. हे डॉक्टर 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते तसेच आता BBMP अधिकारी आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेल्या वैद्यकीय व्यावसायिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करत आहेत.

इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीची 28 वी वार्षिक परिषद बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यात संक्रमित व्यक्तीसह सुमारे 60 वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते. आतापर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डॉक्टरांसह तीन जणांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

बीबीएमपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटकात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 66 वर्षीय दक्षिण आफ्रिकेचा नागरिक होता, जो 20 नोव्हेंबर रोजी बेंगळुरूमध्ये आला होता. त्याच दिवशी त्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आणि त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. BBMP च्या रिपोर्टनुसार त्याच्या 24 प्रायमरी आणि 240 सेकंडरी संपर्कांपैकी कोणीही कोरोना पॉझिटीव्ह आढळले नाही.

दरम्यान, पोलिसांनी क्वारंटाइन नियमांचे उल्लंघन करून अधिकाऱ्यांना न कळवता बाहेर प्रवास केल्याबद्दल गुजरातमधील दक्षिण आफ्रिकन नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवरही आरोग्य अधिकार्‍यांना न सांगता बाधित व्यक्तीला जाऊ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) आणि कर्नाटक महामारी रोग कायदा, 2020 च्या विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पीटीआयने पोलिस अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Crisis: होर्मुजमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या गोलंदाजाचा मृत्यूशी संघर्ष! ICU मधील त्याची अवस्था पाहून क्रिकेट विश्वात हळहळ...

Rahul Gandhi FIR प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाने स्वतःचाच आदेश थांबवला, नेमकं काय घडलं?

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

Washing Machine Safety : वॉशिंग मशीन वापरताना अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर घरात शॉर्टसर्किट होऊन लागू शकते आग

SCROLL FOR NEXT