Rameshwaram Cafe blast case esakal
देश

Rameshwaram Cafe blast case : रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात; संशयितांशी कनेक्शन...

आरोपीचं नाव मोबाईल दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं, अशी माहिती आहे. साई प्रसाद हा भाजप कार्यकर्ता असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येतंय.

संतोष कानडे

Rameshwaram Cafe blast case updates : बंगळूरु येथील सुप्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. या केसमध्ये पोलिसांनी एका भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरु असून त्यांचं दोन संशयितांसोबत कनेक्शन असल्याचं बोललं जातंय.

NIA ने भाजप कार्यकर्ता साई प्रसाद याला ताब्यात घेतलं आहे. साई प्रसादची चौकशी सुरु आहे. मागच्या आठवड्यात एनआयएने शिवमोगा येथे छापेमारी केली होती. यावेळी एका मोबाईल दुकानात आणि दोन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आलेले होतं.

आरोपीचं नाव मोबाईल दुकानात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं होतं, अशी माहिती आहे. साई प्रसाद हा भाजप कार्यकर्ता असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येतंय.

दरम्यान, आठवड्याभरापूर्वी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुझम्मिल शरीफ याला एनएआयने अटक केलीय. एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफला पकडण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये १८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शरीफ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी हुसेनचा सहकारी आहे. दोघांनी मिळून हा स्फोट घडवून आणल्याचं समोर आलेलं होतं.

१ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झाले होते. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सध्या या प्रकरणात अब्दुल मतीन ताहा नावाचा आणखी एक सूत्रधार असून तो सध्या फरार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT