sex racket esakal
देश

Goa Sex Racket l मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका

गोव्यात सांगोल्डा गावाजवळ ५० हजार रुपये देऊन सौदा करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

गोवा (Goa) पोलिसांच्या गुन्हे शाखेने पणजीजवळील सांगोल्डा गावात एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून, एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची मुंबईतून सुटका करण्यात आली आहे. तसेच हैदराबादमधून एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,

हाफिज सय्यद बिलाल नावाचा व्यक्ती वेश्याव्यवसायात गुंतल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. याशिवाय गोव्यात सांगोल्डा गावाजवळ ५० हजार रुपये देऊन सौदा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला.

५० हजारात सौदा ठरला

हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या आरोपीने सांगोल्डा गावाजवळ ५० हजार रुपये देऊन सौदा केल्याचे तपासात समोर आले आहे. १७ मार्च रोजी आरोपी तीन महिलांसह आला असता त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अद्याप तपास करत असून या सेक्स रॅकेटशी संबंधित अनेक महत्त्वाची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

गुन्हा अन्वेषण विभागाचे क्राइम ब्रॅंच पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी काल संध्याकाळी सांगोल्डा येथे वेश्याव्यवसाय प्रकरणी घातलेल्या छाप्यात वेश्या दलाल अफिझ सय्यद बिलाल (37) याला अटक केली आहे. त्याने ग्राहकांना देण्यासाठी आणलेल्या तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची रवानगी मेरशी येथील महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. या तिन्ही महिला महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील आहेत. यातील एका महिलेने टिव्ही चॅनलवर काम केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 22 कॅरेट, 18 कॅरेट अन् 24 कॅरेट सोनं कितीला मिळतंय?

Elon Musk Warning : पृथ्वीवरील लोकांकडे उरली फक्त ५० वर्षे, इलॉन मस्क यांचा गंभीर इशारा... काय आहे अंतराळातील मोठी योजना?

Pune Crime News : पुण्यात खळबळ! भाजप नेत्याच्या गाड्यांवर हल्ला; दगड-बांबूने २ वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड, CCTVच्या वायरही कापल्या

२७ चौकार, १० षटकार! बांगलादेशच्या Towhid Hridoy ची ३५० धावांची नाबाद खेळी; घडवला इतिहास, दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई

Marathi News Live Updates : मेद्चल-मलकजगिरी जिल्ह्यातील बोलाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६० इलेक्ट्रिक डेटोनेटर्स आढळले

SCROLL FOR NEXT