Agriculture Minister Sudhakar Singh Resign esakal
देश

मोठी बातमी! बिहारचे कृषिमंत्री सुधाकर सिंह यांचा तडकाफडकी राजीनामा

महागठबंधन सरकारमध्ये सुधाकर सिंह आरजेडी कोट्यातून मंत्री झाल्याची माहिती आहे.

सकाळ डिजिटल टीम

महागठबंधन सरकारमध्ये सुधाकर सिंह आरजेडी कोट्यातून मंत्री झाल्याची माहिती आहे.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा (Bihar Patna) येथून मोठी बातमी समोर येत आहे. बिहार सरकारमधील कृषी मंत्री आणि आरजेडी आमदार सुधाकर सिंह (Sudhakar Singh) यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात आपल्या वक्तव्यांमुळं चर्चेत असलेल्या सुधाकर सिंह यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केलाय.

कृषिमंत्री सुधाकर सिंह हे बिहार आरजेडीचे (RJD) प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचे पुत्र असल्याची माहिती आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये त्यांना कृषिमंत्री करण्यात आलं. सुधाकर सिंह यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताला त्यांचे वडील आणि आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दुजोरा दिलाय.

महागठबंधन सरकारमध्ये सुधाकर सिंह आरजेडी कोट्यातून मंत्री झाल्याची माहिती आहे. सुधाकर सिंह यांनी आपल्याच सरकारविरोधात बंड पुकारलं होतं. सुधाकर सिंह यांनी खुल्या व्यासपीठावरून बिहार सरकारच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चोर म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. आज त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT