bjp-shivsena 
देश

Vidhan Sabha 2019 : उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यास भाजप राजी

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता आली तर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र युतीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राज्य सुकाणू समितीची बैठक आज दिल्लीत झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हे उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपतर्फे लढविण्यात येणाऱ्या जागांविषयी आणि शिवसेनेबरोबरील युतीबाबत आजच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. प्रत्येक विभागात अस्तित्व टिकविण्यासाठी शिवसेनेने जागा मागितल्या आहेत, त्यावरही बैठकीत चर्चा झाली. बैठक सुरू असताना दिल्लीतून दूरध्वनीवरून शिवसेनेच्या नेत्यांशी मुंबईत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेवर आल्यास शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. मात्र, त्याबरोबर किमान १५० जागा लढविण्याचे भाजपने ठरविले आहे. आज दुपारी १ वाजता सुरू झालेली बैठक रात्री ९.३०ला संपली, यात मतदारसंघांनुसार नावांवर चर्चा झाली. 

राज्यात भाजपमध्ये एकास पाच असे इच्छुकांचे प्रमाण असल्याने संभाव्य बंडखोरीची शक्‍यता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन गटाकडून आजच्या बैठकीत सूचना ऐकण्यात आल्या. भाजपने आयारामांसाठी मुक्त प्रवेश केल्यानंतर पक्ष आणि विचारांशी निष्ठावंत असलेल्यांची नाराजी कशी दूर करायची यावर शहा आणि गडकरी यांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या. 

पुढील आठवड्यात २९ किंवा ३० सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या जागांची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT