BJP Amit Shah in Lok Sabha On Women empowerment Women Reservation Bill political news 
देश

Women Reservation Bill : महिलांना पहिल्यांदा आरक्षण कोणी दिलं? अमित शाहांचं काँग्रेसला लोकसभेत प्रत्युत्तर

रोहित कणसे

महिला आरक्षण हा मुद्दा मागिल काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज लोकसभेत या मुद्द्यावर विरोधक तसेच सत्ताधारी पक्षांकडून भूमिका मांडण्यात आली. यादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत या महिला आरक्षण बिल २०२३ च्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या दरम्यान शाह यांनी आम्ही महिलांना पहिल्यांदा आरक्षण दिलं असा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं.

अमित शाह म्हणाले की, नवीन विधेयक ३०३ ए जे लोकसभेत महिलांना एक तृतिअंश आरक्षण देईल, तसेच नवीन विधेयक ३३२ए जे राज्यातील विधानसभेत एक तृतिअंश महिलांना आरक्षण देईल. यासोबतच एससी आणि एसटी वर्गासाठी जितक्या जागा आरक्षित आहेत, तेथे देखील एक तृतिअंश जागा या महिलांसाठी राखीव असतील असेही अमित शाह यावेळी म्हणाले. या विधेयकामुळे देशातील माता, मातृशक्ती, मुलींचा नितीनिर्धारणात देखील सहभाग वाढेल असेही अमित शाह यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काही पक्षांसाठी महिला सशक्तिकरण एक राजकीय अजेंडा असू शकतो. काही पक्षांसाठी हा एक राजकिय मुद्दा असू शकतो. महिला सशक्तिकरण हा नारा निवडणुक जिंकण्याचं हत्यार असू शकतं पण माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी महिला सशक्तिकरण हा राजकीय मुद्दा नाहीये. तो मान्यतेचा मुद्दा आहे, असेही अमित शाह यांनी सांगितेल

महिलांना पहिल्यांदा आरक्षण PM मोदींमुळेच

पंतप्रधान मोदी हे जेव्हा भारतीय जनता पक्षात संघटनाचे काम करत होते, तेव्हा भाजपच्या गुजरात प्रांताचे संघटन महासचिव होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाची वडोदरा कार्यकारणी झाली होती. त्या ऐतिहासिक कार्यकारणीमध्ये मोदींच्या भूमिकेमुळेच भाजपच्या संघटनात्मक पदांमध्ये एक तृतिअंश आरक्षण महिलांना देण्यात आले होते. मी अभिमानाने सांगू शकतो की असे करणारा माझा पक्ष सर्वात पहिला होता आणि माझा पक्षच शेवटचा असेल.

ते जेव्हा आमच्यासाठी फक्त राजकिय नाही तर कार्यशक्तीचा मुद्दा आहे. महिलांसाठी सुरक्षा, सन्मान हे मोदींनी शपथ घेतल्यापासून श्वास आणि प्राण बनले आहेत. जेंव्हा मोदी देशाचे पंतप्रधान बनले तेंव्हा ७० कोटी लोकांच्या घरी बॅंक अकाऊंट नव्हते, मोदींनी ५२ कोटी बॅंक आकाऊंट उघडले, त्यातले ७० टक्के अकाऊंट महिलांच्या नावे काढले.

काँग्रेसने या देशात पाच दशकांपेक्षा जास्त काळ राज्य केलं, पण गरिबांसाठी काही काम केलं नाही. साधी शौचालयाचीही सोय त्यांच्या काळात नव्हती, मोदींनी पहिल्या ५ वर्षातच ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधले. महिलांना मोफत घरं देण्याच काम आमच्या सरकारनं केलं. १२ कोटी जनतेपर्यंत नल से जल पोहचवण्याचं काम मोदी सरकारनं केलं. जगभरात वैमानिक असलेल्या महिलांची संख्या ही ५ टक्के पण आपल्या देशात ती १५ टक्के आहे, असेही अमित शाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT