narendra modi ANI
देश

Narendra Modi: पंतप्रधान मोदी संपवणार भाजपमधली घराणेशाही; लोकसभेसाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'रेडी?

सकाळ डिजिटल टीम

PM Narendra Modi on dynasticism

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार टीका केली आहे. स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात देखील घराणेशाहीचा उल्लेख केला होता. विरोधकांनी पलटवार म्हणून भाजप पक्षातही घराणेशाही अस्तित्वात आहे असे निदर्शनास आणून दिले होते. याच संदर्भात पंतप्रधान मोदी भाजप पक्षातील घराणेशाहीला चाप लावणार असल्याचं कळतंय.

बुधवारी भाजप नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये पक्षातील घराणेशाहीवर चाप कसा लावता येईल, याबाबत चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. भाजप नेत्यांच्या सर्वच मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही, त्याऐवजी महिला आणि युवकांना उमेदवारी देण्याचा मोदींचा मानस असल्याचं सांगण्यात आलं आहे. भाजप नेत्याच्या अनेक मुलांना येत्या काळात उमेदवारी दिली जाणार नाही. त्याऐवजी महिला आणि तरुणांना प्राधान्य दिले जाणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका नऊ महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांची लोकसभेसाठी तिकीट कापली जाणार असल्याची माहिती आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या अनेक भाषणातून काँग्रेसमध्ये असलेल्या घराणेशाहीवर कठोर टीका केलीये. पण, भाजपमध्येही घराणेशाही असल्याचं लपून राहिलेलं नाही. त्यामुळे मोदी यांना अगोदर भाजप पक्षामध्ये असलेली घराणेशाही संपवावी लागणार आहे. त्यादृष्टीने लोकसभेमध्ये अनेक नेत्यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी घराणेशाही ही भारतीय राजकारणात खोलवर रुतलेली आहे. त्यामुळे मोदी यांना त्यांच्या कामात कितपत यश मिळेल हे पाहावं लागेल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT