BJP leaders in Kerala criticizing that Congress has cheated the people of Wayanad lok Sabha Election Priyanka Gandhi rak94 
देश

Wayanad : वायनाडच्या खासदारकीवरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली! रॉबर्ट वद्रा यांनाही उमेदवारी देण्याचा दिला खोचक सल्ला

काँग्रेसने वायनाडमधील लोकांचा फसवणूक केली आहे, अशी टीका केरळमधील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

तिरुअनंतपुरम : काँग्रेसने वायनाडमधील लोकांचा फसवणूक केली आहे, अशी टीका केरळमधील भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघाची खासदारकी स्वतःकडे ठेवायचा निर्णय घेत केरळमधील वायनाड येथील खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून, तेथील पोट निवडणुकीमध्ये प्रियांका गांधी-वद्रा यांना काँग्रेसच्या वतीने उमेदवारी देण्यात आल्याने भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसने आता पलक्कड येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये रॉबर्ट वद्रा यांनाही काँग्रेसने उमेदवारी द्यावी असा खोचक सल्ला भाजप नेत्यांनी दिला आहे.

भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन म्हणाले, ‘‘गांधी-नेहरू घराण्याचे हित जोपासण्यासाठी, काँग्रेस पक्ष हा केवळ एक साधन आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.’’ आज वायनाडची खासदारकी सोडणारे राहुल गांधी हे निवडणूक प्रचारामध्ये वायनाड हे माझे घर आहे, असा प्रचार करत होते, आता मात्र त्यांनी या कुटुंबाबद्दल त्यांना काय वाटते हे चांगले दाखवून दिले आहे, असे सुरेंद्रन म्हणाले. तर, ‘‘वायनाडमधील नागरिकांनी राहुल गांधींच्या या कृतीबद्दल काँग्रेसला मतदान यंत्रातून चांगली अद्दल घडवावी असे आवाहन, भाजपचे ज्येष्ठ नेते व्ही. मुरलीधरन यांनी ‘एक्सच्या’ माध्यमातून केले आहे.

काँग्रेसकडून प्रत्युत्तर

काँग्रेसचे नेते व्ही.डी. सतीशन यांनी मात्र भाजपकडून होणारी टीका अनाठायी असून केवळ वायनाडच नव्हे तर सर्व केरळ राज्य प्रियांका यांचे स्वागत करेल, असा दावा केला आहे. ‘‘केरळमधील सत्ताधारी ‘युडीएफ’आघाडी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयाचे आनंदाने स्वागत केले आहे. उत्तर भारतातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांनी वायनाड आणि रायबरेली यापैकी रायबरेलीची निवड केली आहे,’’ असे सतीशन म्हणाले. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका या अधिक मताधिक्याने निवडून येथील असा दावाही सतीशन यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT