BJP Madhya Pradesh formula in Rajasthan Amit Shah and JP Nadda discussion with leaders politics Sakal
देश

भाजपचा ‘मध्य प्रदेश’ फॉर्म्युला राजस्थानातही; अमित शहा व जे.पी. नड्डा यांची नेत्यांशी चर्चा

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ७८ जणांची यादी घोषित केली असून यात चार केंद्रीय मंत्री व तीन खासदारांना उमेदवारी दिली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रातील मंत्री व खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा ‘मध्य प्रदेश फॉर्म्युला’ राजस्थानमध्ये लागू करता येईल काय, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा राजस्थानमधील भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ७८ जणांची यादी घोषित केली असून यात चार केंद्रीय मंत्री व तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. या धक्कातंत्राने भाजपच्या मध्यप्रदेशातील नेतेही सावरलेले नाहीत. हाच फॉर्म्युला राजस्थानमध्ये लागू करण्यावर नेत्यांशी विचारविनिमय करण्यासाठी गृहमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे.

मोदी सरकारमध्ये राजस्थानमधून तीन कॅबिनेट मंत्री व दोन राज्यमंत्री आहेत. यापैकी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल या दोन मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.

उर्वरित दोन मंत्र्यांमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे मध्यप्रदेशसाठी भाजपचे प्रभारी असल्याने त्यांना राजस्थानच्या निवडणुकीपासून दूर ठेवले जाईल, याची शक्यता अधिक आहे. हे दोन्ही मंत्री राज्यसभेवर निवडून आलेले आहेत.

यादी इतक्यात नाही

मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानची यादी लगेच जाहीर केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. येत्या काही दिवसात पितृपक्षाला सुरुवात होत आहे. या काळात उमेदवारांची यादी जाहीर होणार नसल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडल्यानंतर राजस्थानमधील उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.

असंतोष ही समस्या

राजस्थानमध्ये मात्र नेत्यांमधील असंतोष ही मोठी समस्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सतावत आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे अजूनही पक्षाच्या कार्यक्रमांपासून फटकून वागत आहेत. परिवर्तन यात्रेतही त्या सामील झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत छायाचित्र व्हायरल झाले होते. भाजप पक्षातील या असंतोषाचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल, याची चाचपणी करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT