Sarbananda Sonowal
Sarbananda Sonowal 
देश

राज्यसभेसाठी भाजपकडून दोन नावांची घोषणा

ओमकार वाबळे

केंद्रीय मंत्री सर्बानंदा सोनोवाल यांच्यासाठी पक्षाने पुन्हा केंद्रात जागा केली आहे. भाजपने राज्यसभेवरील रिक्त होणाऱ्या जागांसाठी दोन नावांची यादी जाहीर केली. यामध्ये आसाम राज्यातून सोनोवाल यांना पोटनिवडणुकीसाठी दावेदारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशातून अल. मुरुगन यांना राज्यसभेवर पाठवण्याची घोषणा भाजपाच्या मुख्य कार्यालयाने केली आहे.

यासंबंधी अधिकृत पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये आसाम आणि मध्य प्रदेशातून रिक्त होणाऱ्या जागांवरून या दोघांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी असणाऱ्या अरुण सिंह यांच्या सहीने हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सोनोवाल हे सध्या केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत आहेत. बंदरविकास, जहाजबांधणी आणि आयुष मंत्रालयाचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. सोनोवाल यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असून राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष देखील होते. तर, डॉ. अल. मुरुगन हे भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष आहेत. मे महिन्यात पार पडलेल्या तामिळनाडू निवडणुकीत भाजपने एआयएडीएमके पक्षासोबत युती केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी; बचावकार्य पूर्ण

Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

SCROLL FOR NEXT