Lal Krishna Advani Bharat Ratna esakal
देश

Lalkrishna Advani health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली! रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिली अपडेट

BJP Leader Lalkrishna Advani Health Latest News: लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लालकृष्ण अडवाणी यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, याआधी त्यांच्यावर एम्समध्ये उपचारही करण्यात आले होते. आता पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना सतत रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, सध्या अडवाणी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या आठवड्यात अडवाणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलं होतं.

मात्र, पुन्हा एकदा अडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक आठवड्यात अडवाणी यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागलं, त्यानंतर त्यांना तात्काळ अपोपो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टर विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अडवाणी सध्या 96 वर्षांचे आहेत, अनेक वर्षांपासून ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : मानसिकदृष्ट्या असमर्थ महिलेवर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT