death death
देश

दिल्ली : महिलेसह चार मुलांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाहदरा येथील सीमापुरी परिसरात महिला आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह घरात आढळून (Bodies found) आले. ही घटना बुधवारी (ता. १९) अघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. घटनेचा पुढील तपास दिल्ली पोलिस करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास जुनी सीमापुरी भागातील घर क्र. ५७ मध्ये काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सीमापुरीचे स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचले असता पाचव्या मजल्यावर चार मुले आणि महिला मृतावस्थेत (Bodies found) दिसली. तेथे अग्निशामक यंत्रही वापरलेले आढळून आले. खोलीत धुराचा वास येत होता.

स्थानिक लोकांची चौकशी केली असता मोहित कालिया (वय ३५) त्याची पत्नी राधा (वय ३०) आणि ४ मुले (दोन मुली ११ वर्षे आणि ४ वर्षे), दोन मुले (वय आठ आणि तीन वर्षे) तेथे राहत असल्याचे पुढे आले. घरात मोहितची पत्नी आणि तीन मुलांचे मृतदेह आढळून (Bodies found) आले. सर्वांत लहान मुलाला वडील मोहित यांनी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हा फ्लॅट शालिमार गार्डनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीकडून एक दिवसापूर्वी भाड्याने घेतला होता. क्राईम टीम, एफएसएल आणि अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत या सर्वांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे दिसून येत आहे. सर्वजण एका छोट्या खोलीत राहत होते. ज्याच्या आत वेंटिलेशनही नव्हते.

मंगळवारी नागपुरात पतीने पत्नी आणि दोन मुलांची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना दिल्लीत महिलेसह चार मुलांचे मृतदेह घरात आढळून आले. यामुळे त्यांची हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिस करीत आहे.

आम्हाला तीन मुल आणि महिला मृत आढळली. नवरा दुसऱ्या मुलासोबत बाहेर गेला होता. मात्र, त्या मुलाचा देखील मृत्यू झाला. या प्रकरणात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येते. परंतु, हत्येची शक्यता नाकारता येत नाही. पतीची चौकशी सुरू आहे.
- निशांत गुप्ता, अतिरिक्त डीसीपी, शाहदरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Attack : मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित घटना ! धावत्या ट्रेनमध्ये तिघांनी तरुणावर केले सपासप वार

Yavatmal Crime: यवतमाळ हादरले! रागाच्या भरात वडिलांनी केला मुलीचा खून; मृतदेह गोठ्यात लटकवून फाशीचा केला बनाव

Latest Marathi News Live Update : नागपुरात नगरसेवक वसीम खान यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे कारण?

Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Pune News: मोठी घडामोड! यशवंत कारखान्याच्या 99 एकर जमीन व्यवहाराला सरकारची पुन्हा स्थगिती, खरेदीखत पूर्ण, तरीही ब्रेक

SCROLL FOR NEXT