IED Bomb esakal
देश

मुलांच्या टिफिनमधून ड्रोनने पाठवला बॉम्ब; पाकिस्तानचा मोठा कट सुरक्षा दलानं उधळला

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचा एक मोठा कट सुरक्षा दलानं हाणून पाडलाय.

जम्मू : पाकिस्तानचा (Pakistan) एक मोठा कट सुरक्षा दलानं हाणून पाडलाय. ड्रोनमधून भारतीय सीमेवर पाठवण्यात आलेला आयईडी बॉम्ब टाकण्यात आला आहे. हा आयईडी बॉम्ब (IED Bomb) मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये ठेवून पाठवलं जात होता. संशयास्पद ड्रोन पाहून सुरक्षा दलांनी त्यामध्ये लटकलेल्या वस्तू काळजीपूर्वक खाली काढल्या. त्यानंतर तो आयईडी बॉम्ब असल्याचं निष्पन्न झालं. नंतर बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला.

दरम्यान, हा आयईडी बॉम्ब टायमर लावून पाठवण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमध्ये काल रात्री बीएसएफनं (BSF) कनाचक परिसरात ड्रोनची हालचाल पाहिली आणि ड्रोनवर गोळीबार केला. ड्रोनला जोडलेले पेलोड खाली आणण्यासाठी ताबडतोब एक पोलिस पथक (Jammu and Kashmir Police) तैनात करण्यात आलं आणि ड्रोनविरोधी एसओपीचं पालन करण्यात आलं.

पेलोडमध्ये मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक केलेले 3 चुंबकीय आयईडी होते, ज्यामध्ये वेगवेगळ्या वेळेसाठी टाइमर सेट केला होता. दरम्यान, आयईडी निकामी करण्यात आला असून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सांगितलं की, कनाचक येथील दयारान परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हे ड्रोन दिसलं. ड्रोनच्या संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आलं. पाकिस्तानकडून मोठा कट रचण्याची योजना असल्याची भीती सुरक्षा दलांना आहे. आयईडीमध्ये टायमर सेट करून पाठवला होता. रात्रीच्या अंधारात हे बॉम्ब कुठे फेकले जाणार होते, याबाबत अद्याप काही स्पष्ट झालेलं नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT