BSP chief Mayawati esakal
देश

कानपूर दंगलीवरून राजकारण तापलं; मायावती स्पष्टच म्हणाल्या, राष्ट्रपती-पंतप्रधानांनी..

सकाळ डिजिटल टीम

कानपूरमध्ये नमाजानंतर झालेल्या दंगलीबाबत आता राजकारण सुरू झालंय.

कानपूरच्या बीकनगंजमध्ये नमाजानंतर झालेल्या दंगलीबाबत (Kanpur Violence) आता राजकारण सुरू झालंय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या अटकेची मागणी केलीय. आता बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनीही या दंगलीबाबत ट्विट केलंय.

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिलंय, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या यूपी दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये उसळला हिंसाचार अत्यंत दुःखद, दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचं अपयशही समोर आलंय. शांतता व सुव्यवस्था नसताना राज्यात गुंतवणूक आणि विकास कसा शक्य होईल, हे सरकारनं समजून घ्यायला हवं, असं त्यांनी नमूद केलंय.

सरकारनं धर्म, जात आणि पक्षीय राजकारणाच्या पलिकडं जाऊन या घटनेची स्वतंत्र आणि निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जेणेकरून राज्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत. शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेला प्रक्षोभक भाषणं टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. कानपूरमध्ये शुक्रवारी दंगल झालीय. त्यात 13 पोलीस जखमी झाले. तर, दंगलखोरांनी मालमत्तेचं मोठं नुकसान केलंय.

कानपूर हिंसाचाराच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली राज्यातील योगी सरकारला घेरलं आणि भाजप (BJP) नेत्याच्या अटकेची मागणी केलीय. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री शहरात असूनही पोलिस-गुप्तचर विभाग अपयशी ठरल्याचं अखिलेश यादव यांनी ट्विट केलंय. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी दिलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळं कानपूरमध्ये अशांतता पसरली असून, भाजप नेत्याला अटक व्हायला हवी, असंही त्यांनी नमूद केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT