Cm Eknath Shinde Amit Shah Narendra Modi Sakal
देश

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; CM शिंदे दिल्लीला रवाना, शहांची घेणार भेट

राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मिळणार मंत्रिपदं

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय आणि राज्यातील मंत्रिमंडळाच्या हालचालींना वेग आल्याची सध्या चर्चा आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. याठिकाणी ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळं या भेटीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. (Cabinet Expansion CM Eknath Shinde leaves for Delhi will meet Amit Shah)

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला मंत्रिपद मिळण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. शिंदे गटाच्या वाट्याला दोन मंत्रिपदं येणार असल्याचीही यानिमित्त चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विमानतळावर दाखल झाले आहेत.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत निर्णय झाल्यानंतर ते दोघेच याबाबत अधिकृत माहिती देतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन मंत्रिमंडळाचं आकारमान किती असावं? कोणाला मंत्रिपदं द्यायची तसेच त्यांना कुठली खाती द्यायची हे ते निश्चित करतील. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

Chenab Bridge : आयफेल टॉवरप्रमाणे चिनाब पुलाचेही घेता येणार विहंगम दर्शन!

Navratri Diet Tips for Fast: नवरात्रीत उपवासाचे पदार्थ खाताय? पचन चांगलं ठेवण्यासाठी आहारात वाढवा 'हे' पोषणतत्त्व

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT