देश

CBSE बोर्ड दहावी परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाची बातमी; निकाल जाहीर होणार...

कृपादान आवळे

नवी दिल्ली : केंद्रीय दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागेल, या प्रतिक्षेत देशातील अनेक विद्यार्थी होते. मात्र, आता त्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. कारण आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या (ता.15) जुलैला जाहीर केला जाणार आहे.  याबाबतची घोषणा मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, आता त्यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जात आहे. त्यानंतर परीक्षांचे निकाल कधी येतील, याबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या.

तसेच बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दहावी परीक्षेचा निकाल कधी हे निश्चित नव्हते. त्यासंदर्भात काही चर्चाही सुरु होत्या. पण आता खुद्द मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीच ट्विट करून दहावी परीक्षेचा निकाल उद्या लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या हजारो विद्यार्थ्यांचा निकाल मिळणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी 7 मेला निकाल

गेल्या वर्षी 7 मेला निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, यंदा कोरोनाचे संकट देशात असल्याने निकाल जाहीर होण्यास उशीर झाला. आता उद्या निकाल विद्यार्थ्यांना पाहिला मिळणार आहे. 

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना बुधवारी ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in पाहता येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT