CBSE Board Exams Date Announced  
देश

CBSE Board Exams : 31 डिसेंबरला होणार दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा

सकाळ ऑनलाईन टीम

CBSE Board Exams Date Announced on 31st December: 31 डिसेंबरला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी शनिवारी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे.  यापूर्वी  शिक्षणमंत्र्यांनी CBSE बोर्डाची 10 वी आणि 12 वीची परीक्षा जानेवारी-फ्रेब्रुवारी 2021 होणार नसल्याचे सांगितले होते. फेब्रुवारीनंतर परीक्षा कधी घ्यावी यासंदर्भात विचार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.   

कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. अनेक परीक्षाप्रमाणे सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षाही लांबणीवर पडल्या आहेत. कोरोनाजन्य परिस्थितीत परीक्षा घेऊ नये, अशी मागणी पालकांकडूनही करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाचा विचार करुन तज्ञ्जांची मते घेतल्यानंतर फेब्रुवारीनंतर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा नेमकी कधी होणार? याची विद्यार्थी तसेच पालक वर्गामध्ये उत्सुकता आहे. यासंदर्भात 31 डिसेंबरला घोषणा करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT