Indian parliament 
देश

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून होण्याची शक्यता

विनायक होगाडे

नवी दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होऊ शकतं. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. Cabinet Committee on Parliamentary Affairs (CCPA) ने 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान मॉन्सून सत्र ठेवण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात खासदारांना हे अधिवेशन सुरु व्हायच्या आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एका महिन्यापर्यंत चालणाऱ्या या मॉन्सून सत्रादरम्यान 20 बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होतं आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होतं. सूत्रांनी सांगितलंय की, संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या अधिवेशनाच्या कार्यकाळासंदर्भात शिफारस केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणाऱ्यांनी कोरोना लशीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Pudina Rice Recipe: नॉन-व्हेजलाही विसरायला लावेल गरमागरम पुदीना राईस; पावसाळ्यात लंचसाठी एकदा नक्की ट्राय करा

Marathi Live Updates : मुसळधार पावसाने अंबा नदीचा जोडरस्ता जलमय, राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प

Tukaram Mundhe Water Inspection : तुकाराम मुंढेंना आता वेगळं काम; हॉटेलमध्ये मिळणारे जारमधील पाणी तपासणार, एसओपी तयार करण्याचे निर्देश

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची बातमी समजताच सर्वात आधी कोणाला फोन केला? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT