child helmet sakal media
देश

आता बालकांनाही हेल्मेट आवश्यक

लहानगा प्रवासी सोबत असल्यास मोटारसायकलस्वाराने ताशी चाळीस किलोमीटरची वेगमर्यादा ओलांडता कामा नये, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मोटारसायकलस्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे बंधनकारक असताना आता चार वर्षांखालील मुलांना देखील यापुढच्या काळात मोटारसायकलवरील प्रवासासाठी हेल्मेट आवश्यक असेल. शिवाय, लहानगा प्रवासी सोबत असल्यास मोटारसायकलस्वाराने ताशी चाळीस किलोमीटरची वेगमर्यादा ओलांडता कामा नये, यावर केंद्र सरकार लक्ष ठेवणार आहे.

यासाठी मोटारसायकलवरील प्रवासात चार वर्षांखालील बालकांच्या सुरक्षेसाठी मोटारवाहन कायद्याच्या १२९ व्या कलमात सुधारणा केली जाणार असून यासंदर्भातील प्रस्तावित नियमांचा मसुदाही नितीन गडकरींच्या परिवहन मंत्रालयाने जाहीर केला आहे. या प्रस्तावित नियमांनुसार, चार वर्षांखालील बालक सोबत असल्यास मोटारसायकलस्वाराने बालकाला आपल्या शरीराशी घट्ट बांधून ठेवणारा सुरक्षा पट्टा (सेफ्टी हार्नेस) वापरावा.

यासोबतच, नऊ महिन्यांवरील ते चार वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी त्यांच्या मापाचे हेल्मेट किंवा सायकलस्वारांसाठी वापरले जाणारे हेल्मेट त्यांच्या डोक्यावर असावे, याची याची जबाबदारी मोटारसायकल स्वारावर असेल. या हेल्मेटचे निकष ब्युरो ऑफ इंडियन्स स्टॅन्डर्डतर्फे निश्चित केले जातील. त्याचप्रमाणे, चार वर्षांपर्यंतचे बालक मागे बसलेले असल्यास मोटारसायकलीचा वेग ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा अधिक असता कामा नये, असेही या प्रस्तावित नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाकडून तेल खरेदी, तरीही टॅरिफ नाही! ट्रम्प यांचा भारताला मोठा दिलासा

Mira-Bhayandar: मिरा-भाईंदर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, पत्रकारांना बेदम मारहाण; Video Viral

Who Is Deepa Bhati : तीन मुलांची आई, वयाच्या ४० व्या वर्षी यूपी पीसीएसमध्ये यश; लग्नानंतर १८ वर्षांनी दीपा भाटी बनल्या अधिकारी

Hasan Mushrif On Gokul Election : 'गोकुळ'च्या राजकारणात नवा ट्विस्ट! मुख्यमंत्र्यांच्या हातात असणार अध्यक्षपदाची सूत्रे, मंत्री हसन मुश्रीफांनी काय केलं जाहीर?

Equal Pay Demand: समान काम, समान वेतन द्या...न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम

SCROLL FOR NEXT