Arvind Kejriwal  sakal
देश

Arvind Kejriwal : नव्या समन्सकडेही केजरीवालांचे दुर्लक्ष

दिल्ली जलमंडळातील कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या पहिल्या नोटिसीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठ फिरवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्ली जलमंडळातील कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या पहिल्या नोटिसीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठ फिरवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी हजर रहावे, असे समन्स ‘ईडी’ने बजावले होते.

मात्र केजरीवाल चौकशीला हजर राहिले नाहीत. न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला असताना केजरीवाल यांना वारंवार का समन्स बजावले जात आहेत, असा सवाल ‘आप’ने उपस्थित करतानाच, ईडीचे समन्स बेकायदा असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांना एकाचवेळी दोन प्रकरणांत ‘ईडी’ने समन्स बजावले होते. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर भाजपने टीका केली आहे.

केजरीवाल हे सतत चौकशीपासून दूर पळत आहेत, याचा अर्थ त्यांचा गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

सत्येंद्र जैन यांना नियमित जामीन नाही

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना नियमित जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. जामिनाबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या जात असून जैन यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावे, अशी टिपणी खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली.

सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामीन अर्जावरील युक्तिवाद गेल्या जानेवारी महिन्यात पूर्ण झाला होता. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हवाला प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या जैन यांना मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर जामीन दिला होता. आज जामीन नाकारल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जैन यांनी तिहार तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT