Karnataka Political Crisis esakal
देश

Karnataka Political Crisis : कर्नाटक सरकार पडण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री संतापले; भाजप अन् जेडीएस...

जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी यांनी एक दावा करत कर्नाटकमधलं काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं होतं.

संतोष कानडे

बंगळूरुः जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामी यांनी एक दावा करत कर्नाटकमधलं काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचं म्हटलं होतं. भाजपच्या सत्तास्थापनेचा त्यांचा दावा मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी फेटाळून लावला आहे.

कुमारस्वामींचा दावा काय?

५० ते ६० आमदारांचा एक मोठा गट फुटून भाजपमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस सरकार कोसळू शकतं. कुणामध्येत प्रमाणिकपणा उरलेली नाहीये, असा दावा कुमारस्वामींनी केला होता.

मुख्यमंत्री सिद्धरामैय्या काय म्हणाले?

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप आणि जेडीएस यांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसून सत्तेसाविना त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

कुमारस्वामी म्हणाले होते की, काँग्रेसमधला एका मोठा मंत्री आमदारांच्या मोठ्या गटाला सोबत घेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. केंद्राच्या तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी संबंधित मंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांची केंद्रातील भाजप नेतृत्वासोबत बातचित सुरु आहे.

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, निवडणुकीनंतर जेडीएसचं काहीही अस्तित्व उरलेलं नाही. अस्तित्व वाचवण्यासाठी कुमारस्वामी संघर्ष करीत आहेत. परंतु लोकसभेपूर्वीच भाजप आणि जेडीएसचं अस्तित्व उरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT