china esakal
देश

चीननं दिली धमकी; अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेने (america) चीन (china) विरोधात मोठं पाऊल उचलत २०२२ साली बिजिंगमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बॉयकॉट (diplomatic boycott) म्हणजेच आपले राजनैतिप्रमाणेच स्पर्धेला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं देखील अमेरिका प्रमाणेच पाऊल ठेवत डिप्लोमॅटिक बॉयकॉटचा मार्ग स्वीकारला आहे. त्यापाठोपाठ ब्रिटन आणि कॅनडानंही बिजिंग ऑलिम्पिकवर धोरणात्मक बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर चीनने जगातील प्रगत देशांना धमकी दिली आहे.

चीनकडून थेट इशारा

चीनमधील बिजिंग आणि शिनजियांग प्रांतामध्ये उग्यूर आणि तुर्की भाषिक मुस्लिमांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांकडून सातत्याने निषेध केला जात असून चीनला समज दिली जात आहे. त्यानंतर चीनने जगातील महासत्तांना आणि प्रगत देशांना उघड धमकीच दिली आहे. चीननं आता आक्रमक भूमिका जाहीर केली असून बिजिंग ऑलिम्पिकवर अशा प्रकारे धोरणात्मक बहिष्कार टाकणाऱ्या देशांना थेट इशारा दिला आहे.

''त्यांना किंमत चुकवावीच लागेल''

चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी यासंदर्भात चीनची भूमिका स्पष्ट करताना इतर देशांना इशारा दिला आहे. “अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा यांनी ऑलिम्पिक स्पर्धांचा वापर राजकीय हेतूसाठी केला आहे. हे अजिबात स्वीकारार्ह नसून स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. ते करत असलेल्या या चुकीच्या गोष्टींसाठी त्यांना किंमत चुकवावीच लागेल”, असं वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT