Narendra Modi Ram Mandir Siddaramaiah  esakal
देश

Modi Ram Mandir: मोदींना लोकसभा जिंकण्याचा विश्वास नसल्यानेच राममंदिर उद्‌घाटनाचा घाट; मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढील लोकसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नाही.

सकाळ डिजिटल टीम

चार शंकराचार्यांनी ‘राजकारणासाठी राममंदिराचा गैरवापर केल्याच्या निषेधार्थ मंदिराच्या अभिषेकावर बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे.

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढील लोकसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळेच अपूर्ण अवस्थेत राममंदिराचे (Ram Mandir) उद्‌घाटन करून हिंदुत्वाच्या नावावर निवडणूक जिंकण्याची रणनीती भाजप खेळत आहे. देशातील जनता हिंदू धर्माच्या जाळ्याला बळी पडणार नाही. संघ परिवारातील नेत्यांनी श्री राम आणि देशातील १४० कोटी जनतेचा अनादर केल्याची टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे.

भाजपने धार्मिक कार्यक्रमाचे राजकीय प्रकरण बनवल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी केला. अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित न राहण्याच्या काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाचा त्यांनी बचाव केला. आपण सर्वच भगवान श्रीरामाचे भक्त आहोत. परंतु, आम्ही भाजपकडून राजकीय फायद्यासाठी श्री राम मंदिराचा वापर करण्यास विरोध करत आहोत. गेल्या ३५ वर्षांपासून मतदार भाजप आणि संघ परिवाराचे राजकारण गांभीर्याने पाहत आहेत. लोकांनी आधीच विटांच्या नावावर जमा केलेल्या देणग्यांचा हिशेब मागायला सुरुवात केली आहे, असे ते म्हणाले.

राममंदिरावर शैव आणि शाक्तांचा अधिकार नसल्याच्या राममंदिर ट्रस्टच्या सचिवाच्या कथित विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. जर ते खरे असेल तर तो सर्व शैवांचा अपमान आहे. चार शंकराचार्यांनी ‘राजकारणासाठी राममंदिराचा गैरवापर केल्याच्या निषेधार्थ मंदिराच्या अभिषेकावर बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे.

शिवाय मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, असा दावाही त्यांनी केला. एक्सवर दिलेल्या निवेदनात, सिद्धरामय्या यांनी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या अयोध्येतील उद्‌घाटन कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. काँग्रेस हिंदू धर्माच्या विरोधात नाही. अस्पृश्यता, जातिवाद आणि राजकारणासाठी धर्माचा वापर करण्याच्या विरोधात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT