Commonwealth Games 2022 Sindhu Lakshya Sen in finals 
देश

Commonwealth Games 2022 : सिंधू, लक्ष्य सेन अंतिम फेरीत

किदांबी श्रीकांत ब्राँझपदकासाठी लढणार

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये महिलांच्या एकेरीत अद्याप सुवर्णपदक जिंकू न शकलेली पी. व्ही. सिंधू यंदा मात्र आपले ध्येय पूर्ण करील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारताच्या या शटलक्वीनने रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत सिंगापूरच्या यिओ मीन हिला पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेन यानेही पुरुषांच्या एकेरीत जेसन तेह येंग याला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धांची त्याने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. सिंधू व लक्ष्य हे दोन्ही खेळाडू सुवर्णपदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील.

सिंधूने उपांत्य फेरीची लढत अगदी सहज जिंकली. तिने मीनवर २१-१९, २१-१७ अशा फरकाने विजय संपादन केला. भारताच्या फुलराणीने ४९ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवले. सिंधूसमोर सुवर्णपदकासाठीच्या लढतीत कॅनडाच्या मिशेल ली हिचे आव्हान असणार आहे.

लक्ष्यला उपांत्य फेरीची लढत जिंकायला संघर्ष करावा लागला. लक्ष्यने पहिल्या गेममध्ये २१-१० अशा फरकाने यश मिळवले. पण दुसऱ्या गेममध्ये तेह याने २१-१८ अशी बाजी मारत १-१ बरोबरी साधली. लक्ष्यने तिसऱ्या गेममध्ये प्रयत्नांची शिकस्त केली. हा गेम त्याने २१-१६ अशा फरकाने जिंकला व सुवर्णपदक जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. या लढतीत त्याला मलेशियाच्या एनजी योंग याचा सामना करावयाचा आहे.

दरम्यान, एनजी योंग याने भारताच्या किदांबी श्रीकांतवर १३-२१, २१-१९, २१-१० अशा फरकाने विजय मिळवला आणि आगेकूच केली. या लढतीतील पराभवामुळे श्रीकांतचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंग पावले. त्याला ब्राँझपदकासाठी लढावे लागणार आहे. त्याची ही लढत जेसन तेह येंग याच्याशी होईल.

दुहेरीतही पदकाची संधी

भारताला दुहेरी प्रकारातही पदक जिंकण्याची संधी असणार आहे. सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी या भारताच्या अनुभवी जोडीने पेंग चॅन - कियान टॅन या जोडीला २१-१६, २१-१५ असे हरवले आणि पुरुषांच्या दुहेरीची अंतिम फेरी गाठली. ट्रेसा जॉली व गायत्री गोपीचंद या जोडीला महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत व्हावे लागले असले, तरी त्यांना उद्या ब्राँझपदक जिंकण्याची संधी असणार आहे. पिअर्ली कूंग ली - तिन्नाह मुरलीधरन या जोडीने जॉली व गायत्री या जोडीला २१-१३, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले आणि अंतिम फेरीत वाटचाल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT