Bharat Jodo Yatra  esakal
देश

Rahul Gandhi : अमित शाहांनी फक्त जम्मू ते काश्मीर यात्रा करुन दाखवावी, राहुल गांधींचं चॅलेंज

सकाळ डिजिटल टीम

श्रीनगरः राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी ४० हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा केली आहे. या यात्रेच्या समारोपानंतर राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चॅलेंज केलं.

श्रीनगर येथे आज राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग आणि बॉम्बस्फोट होत आहेत. जर सुरक्षा व्यवस्था एवढी तगडी आहे तर भाजप लाल चौकातून जम्मूपर्यंत यात्रा का करत नाही?

राहुल पुढे म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह जम्मू ते काश्मीर अशी यात्रा का करत नाहीत? त्यांनी यात्रा करुन दाखवावी. मला वाटतंय की, येथे सुरक्षा व्यवस्था ठीक नाही. मी जम्मू काश्मीरमध्ये जे काही बघतोय ते पाहून दुःखी आहे.

चीनसोबत सुरु असलेल्या वादावरुन राहुल गांधींनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, मी निवृत्त जवान आणि लडाखवासियांना भेटलो, त्यावरुन चीनने आपली दोन हजार वर्ग किलोमीटर जमीन बळकावल्याचं समोर आल्याचं स्पष्ट होत आहे. भारताचे अनेक पेट्रोलिंग पॉईंटस् आता चीनच्या ताब्यात आहेत. सरकारने हे नाकारलं तर चीनचं आत्मबल वाढेल, असं राहुल गांधी म्हणालेत.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

यावेळी राष्ट्रगीत गात राहुल गांधी यांनी ध्वजारोहण केले. यानंतर श्यामलाल गुप्ता यांचं प्रसिद्ध गीत, विजय विश्व तिरंगा प्यारा हे गायले. काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती.

आता ती जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे. आज कडक बंदोबस्तात राहुल गांधी यांनी लाल चौकात ध्वजारोहण केले. राहुल श्रीनगरमधूनच आज 5.30 वाजता पत्रकार परिषद घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT