priyanka gandhi ANI
देश

७० वर्षांचं रडगाणं थांबवा, ७ वर्षात तुम्ही काय केलंत - प्रियांका गांधी

सकाळ डिजिटल टीम

केंद्र सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. मोदी परदेशात फिरण्यामध्ये व्यस्त आहेत. ते जनतेची दिशाभूल करत असल्याची टीकाही काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केली.

जयपूर - काँग्रेस (Congress) नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर (Modi Govt) निशाणा साधला. त्यांनी जयपूरमध्ये काँग्रेसच्या रॅलीत बोलताना म्हटलं की, केंद्र सरकारला जनतेचं भलं व्हावं असं वाटत नाही, ते फक्त मोजक्याच उद्योगपतींसाठी करत आहेत. जे सरकार केंद्रात आहे त्यांना जनतेचं भलं करण्याची इच्छा नाही. ते तुमच्यासाठी करत नाहीत. कोणासाठी काम करत आहेत ते जगाला दिसतंय. फक्त मोजक्या उद्योगपतींसाठी सरकार काम करतंय असंही प्रियांका गांधींनी म्हटलं.

प्रियांका गांधी म्हणाल्या, दोन प्रकारची सरकारे सत्तेत असतात, एक सेवा आणि समर्पण हे ध्येय ठेवून कार्यरत असतं, तर दुसरं सरकार खोटं, लोभ आणि लूट यांच्याभोवती फिरणारं असतं, सध्याचं केंद्र सरकार हे दुसऱ्या प्रकारचं आहे. फक्त खोटं आणि लूट एवढंच सुरु आहे.

मोदी सरकारला सवाल करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं असं मोदी सरकारकडून सतत विचारलं जातं? मी म्हणते, ७० वर्षांचं रडगाणं बंद करा, तुम्ही ७ वर्षात काय केलं ते सांगा. काँग्रेसनं ७० वर्षात जे काही केलं होतं ते भाजप सरकारला विकायचं आहे.

तुम्ही ज्या पद्धतीने दररोज महागाईशी लढत आहात तसेच आम्हीही जीव तोडून तुमची लढाई लढू. हे फक्त तुमचं युद्ध नाही तर माझंही युद्ध आहे. सोनियाजींचा लढा आहे, माझा भाऊ राहुलचा लढा आहे. आम्ही तुमच्या सोबत आहे आणि हा लढा लढत राहू. केंद्र सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. मोदी परदेशात फिरण्यामध्ये व्यस्त आहेत. ते जनतेची दिशाभूल करत असल्याची टीकाही काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT