smruti irani esakal
देश

Rahul Gandhi in Parliament: 'गांधी कुटुंबात हिंमत असेल तर...'; स्मृती इराणींचा जोरदार पलटवार

Rahul Gandhi in Parliament: खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी संसदेत बोलत होते. राहुल गांधी बोलत असताना प्रंचड गोधळ झाल्याचा पाहायला मिळाला.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi in Parliament:

नवी दिल्ली- खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी संसदेत बोलत होते. राहुल गांधी बोलत असताना प्रंचड गोधळ झाल्याचा पाहायला मिळाला. राहुल गांधींनी मणिपूरवरुन भाजपवर जोरदार हल्लाबोल सुरु केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला.

यांच्याच आघाडीतील एका नेत्याने म्हटलं होतं की, भारताचा अर्थ केवळ उत्तर भारत आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या साथीदाराच्या वक्तव्याचे खंडन करावे. काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरमध्ये जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केलं होतं. जम्मू-काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे. गांधी कुटुंबात हिंमत असेल त्यांनी याचे खंडन करुन दाखवावे, असं स्मृती इराणी म्हणाल्या.

ज्यांनी भारत मातेचे तुकडे झाले असं वक्तव्य केलं, त्यावरुन मनात कुणाच्या गद्दार आहे हे स्पष्ट झाले. मणिपूर हा भारत मातेचा अविभाज्य भाग आहे. त्याचे तुकडे झालेले नाहीत. राहुल यांना भारत मातेचे तुकडे झाले असं म्हणण्याचा काही अधिकार नाही. त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांना भारताचे तुकडे झाल्याचं पाहायचं आहे. यासाठी काही जण सुप्रीम कोर्टातही गेले होते. याबाबत राहुल काय करणार आहेत, असं म्हणत इराणी यांनी टीका केली.

स्मृती इराणी जेव्हा बोलत होत्या, तेव्हा राहुल गांधी यांनी सभागृह सोडल्याचं पाहायला मिळालं. तसेच इराणी यांच्या भाषणावेळी काँग्रेस नेत्यांनी 'इंडिया-इंडिया'च्या घोषणा दिल्या. लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्या सुचनेनंतरही काँग्रेस नेत्यांनी घोषणा सुरुच ठेवल्या. विरोधकांच्या घोषणांनी चिडलेल्या इराणी यांनी जोरदार पलटवार केला. इराणी यांनी देशातील इतर राज्यात होत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचला. काश्मिरमध्ये अनेक महिलांवर बलात्कार झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच काँग्रेसच्या काळातील अत्याचारावर तुम्ही का बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे पंचांग आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०२६

Video: अंपायरने नॉट आऊट दिलं, पण कर्णधार वैभव सूर्यवंशीचा मास्टरस्ट्रोक! शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाने मिळाली विकेट

Jat Wildlife Attack : सांगलीत धक्कादायक घटना! जतमधील अंकले येथे वन्य प्राण्याच्या हल्ल्यात 75 वर्षीय पोलिस पाटलाचा दुर्दैवी मृत्यू, शेळ्या चारण्यासाठी गेले अन्...

Marathi News Live Updates : कोल्हापूर शहरात आज आणि उद्या कमी दाबाने होणार पाणीपुरवठा, काय आहे कारण?

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

SCROLL FOR NEXT