Rahul Gandhi Sakal
देश

Rahul Gandhi : "कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मी..."; घर रिकामं करणाऱ्या नोटिशीला राहुल गांधींनी दिलं उत्तर

मोदी आडनावाबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द झाली.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi News : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना दिलेलं निवासस्थानही आता रिकामं करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली आहे. त्यांना या नोटिशीला राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे.

या नोटिशीला दिलेल्या उत्तरात राहुल गांधी म्हणतात, "गेल्या चार टर्मपासून लोकसभेचा नियुक्त सदस्य म्हणून मी इथे घालवलेल्या आनंददायी आठवणींचा मी ऋणी आहे. माझ्या हक्कांबद्दल कोणतेही पूर्वग्रह न ठेवता मी पत्रातील सूचनांचं नक्कीच पालन करेन."

राहुल गांधींची खासदारकी रद्द

राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी २०१९ साली एक विधान केलं होतं. मोदी नावाचे सगळेच चोर असतात का? असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. यानंतर पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला. राहुल गांधी यांनी मोदी समाजाचा आणि ओबीसींचा अपमान केल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता.

या याचिकेची दखल घेत सूरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. तसंच आता त्यांना त्यांचं शासकीय निवासस्थान रिकामं करण्याचे आदेशही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: पहिल्या यादीत ५३३ शेतकऱ्यांना कर्जमाफी; सहकारमंत्र्यांची माहिती, प्राप्तिकर विभागाच्या माहितीअभावी विलंब

IPL परकीय चलन प्रकरणात ललित मोदींना १६ वर्षांनंतर आफ्रिकेतील न्यायालयाचा दिलासा; ईडीचा दंड रद्द

Latest Marathi Update : 'चलो संसद' आंदोलनामुळे दिल्लीतील १६ मेट्रो स्थानके आजही बंद; कडक सुरक्षा व्यवस्था

Pune Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ पुणे काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

अर्थपूर्ण पर्स : गरज आणि चैनीतला फरक ओळखा

SCROLL FOR NEXT