congress 
देश

पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर; मनमोहन सिंग, सोनिया, राहुल, प्रियंका गांधी करणार प्रचार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपचीच चर्चा सुरु आहे. मात्र, या निवडणुकीत आता काँग्रेसही जोर लावणार आहे. कारण, काँग्रेसनं नुकतीच ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh), खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा या यादीत समावेश आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ही स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. या यादीमध्ये सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भूपेश बघेल, कमलनाथ, अधिर रंजन चौधरी, बी. के. हरिप्रसाद, सलमान खुर्शीद, सचिन पायलट, रणदीपसिंह सुर्जेवाला, जितीन प्रसाद, आर. पी. एन. सिंह, नवज्योतसिंग सिद्धू, अब्दुल मन्नान, प्रदीप भट्टाचार्य, दीपा दासमुन्शी, ए. एच. खान चौधरी, अभिजीत मुखर्जी, दिपेंद्र हुडा, अखिलेश प्रसाद सिंह, रामेश्वर ओराओन, अलमगिर अलम, मोहम्मद अझरुद्दीन, जयवीर शेरगील, पवन खेरा, बी. पी. सिंह या तीस जणांचा या यादीत समावेश आहे. 

दरम्यान, या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही काँग्रेस नेत्याचं नाव नसल्याने त्यावरुन सोशल मीडियात टीकाटिपण्णी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्या नावाचा काँग्रेस हायकमांडला विसर पडला काय? असा सवालही नेटकऱ्यांनी विचारला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT