Corona sakal media
देश

देशात रुग्णसंख्येत मोठी घट; १.६७ लाख नवे रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

गेल्या २४ तासात देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आढळून आली आहे.

देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग कमी झाला असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या आत आढळून आली आहे. काल दिवसभरात १ लाख ६७ हजार ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसंच दिवसभरात २ लाख ५४ हजार ७६ नवे रुग्ण सापडले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या १७ लाख ४३ हजार ५९ इतकी झाली. तर रिकव्हरी रेट हा ९४.६० टक्के इतका झाला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही कमी झाला असून तो ११.६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या २४ तासात देशात १ लाख ६७ हजार ५९ नवे रुग्ण आढळून आले. तर २ लाख ५४ हजार जणांनी कोरोनावर मात केली. देशात बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ९२ लाख ३० हजार १९८ इतकी आहे. सध्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रीय रुग्णांची संख्या ही ४.२ टक्के इतकी आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनामुळे ११९२ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. आतापर्यंत १६६.६८ कोटी डोस देण्यात आले आहेत. तसंच चाचण्यासुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासात देशात १४ लाख २८ हजार ६७२ कोरोना टेस्ट झाल्या. आतापर्यंत ७३.०६ कोटी कोरोना चाचण्या झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugauli Treaty: भारताविरोधात मदतीची मागणी, पण ब्रिटनने हात झटकले; नेपाळचे पंतप्रधान बालेन शाहांची कोंडी

१४१३ कोटींची संपत्ती, पण ना मर्सिडीज ना ऑडी; डीके शिवकुमार यांच्या नावावर फक्त एकच जुनी कार!

'कृष्णाईच्या लेकी'मध्ये 'हा' अभिनेता साकारणार नायक; 'सहकुटुंब सहपरिवार'मधील अभिनेत्रीचीही एंट्री; पाहा संपूर्ण कास्ट

Latest Marathi News Update : नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Thane News: खोट्या कागदपत्रांच्या आधारे उभारली सात मजली इमारत, बिल्डरला अटक; रहिवाशांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT