Dr. Bharati Pawar on India Corona Update टिम ई सकाळ
देश

India Corona Update : कोरोनाचं संकट वाढलं! देशात 10 आणि 11 एप्रिल रोजी मॉक ड्रील

India Corona Update: देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत आहे.

संतोष कानडे

India Corona Update: देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत आहे. आज नव्याने ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच अनुषंगाने आता देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मॉक ड्रीलबद्दल माहिती दिली.

देशात काय स्थिती?

कालच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे ५ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णसंख्या ४ कोटी ४७ लाख ३९ हजार ५४ इतकी झाली आहे. मागच्या १९५ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे. (Latest Marathi News)

सध्या देशभरात २५ हजारांच्या पुढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात ३ जणांचा मृत्यू झालेला असून ८०३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३ हजार ९८७ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील घेण्यात येईल. यामध्ये बेड कॅपॅसिटी, मेडिसिन, ऑक्सिजन पुरवठा याबाबत केंद्रीय आरोग्य विभाग आढावा घेणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT