Covaxin Sakal
देश

कोव्हॅक्सिनला WHO ची मंजुरी रखडणार? भारत बायोटेकला विचारले नवे प्रश्न

सकाळ डिजिटल टीम

भारतात तयार झालेली कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यास आणखी उशिर होऊ शकतो.

नवी दिल्ली - भारतात तयार झालेली कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यास आणखी उशिर होऊ शकतो. भारत बायोटेकला आणखी काही टेक्निकल प्रश्न विचारण्यात आले असल्याचे समजते. यामुळे भारतीयांना विशेषत: विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर परिणाम होऊ शकतो. या मंजुरीशिवाय कोव्हॅक्सिनला जगभरातील बहुतांश देश अधिकृत लस मानणार नाहीत. भारत बायोटेकने मंजुरीसाठी आवश्यक तो सर्व डेटा दिल्यानंतरही त्यांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतंच असं सांगितलं होतं की, लशीचा कधीही मंजुरी मिळू शकते. मात्र आता त्याऊलट अशी परिस्थिती समोर आली आहे. एएनआयने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, केंद्रीय राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी असं म्हटलं होतं की, मंजुरीसाठी कागदपत्रे देणे ही एक प्रक्रिया आहे. कोव्हॅक्सिनला लवकरच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळेल. याआधी नॅशनल एक्स्पर्ट ग्रुपचे डॉक्टर वीके पॉल यांनीही म्हटलं होतं की, कोव्हॅक्सिनसाठी जागतिक आऱोग्य संघटनेची मंजुरी या महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे.

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल यशस्वी पार पडली होती. त्यात कोव्हॅक्सिन लस ही ७७.८ टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं होतं. देशभरात लसीकरण मोहिमेत कोविशील्डसह कोव्हॅक्सिन लशीचे डोसही देण्यात आले आहेत. देशात जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु आहे. कोव्हॅक्सिन, कोविशील्डशिवाय रशियाची स्पुटनिकसुद्धा आता भारतात उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I Live: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! अनोखे 'शतक' अन् मोडला रोहित शर्माच्या नावावर असलेला विक्रम

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Alephata Garbage: आळेफाटा बायपासवर कचऱ्याचे ढीग; दुर्गंधीने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त

IND vs NZ 2nd T20: भारतीय गोलंदाजांचा सुरुवातीला कहर, मग फिलिप्स-जॅकोब्सचा पलटवार! न्यूझीलंडने डाव सावरला, अखेर काय घडलं?

SCROLL FOR NEXT