Criticism of Prithviraj Chavan Congress party politics rahul gandhi sonia gandhi  esakal
देश

‘भारत जोडो’ काँग्रेसची कुठे राहिली? पृथ्वीराज चव्हाण यांची टीका!

ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका; सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या कार्यशैलीवर सातत्याने उघड नाराजी व्यक्त करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पक्षाच्या प्रस्तावित आणि बहुचर्चित अशा ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये आपण जाणार नसल्याचे म्हटले आहे. ‘‘आता ही यात्रा कॉँग्रेसची तरी कुठे राहिली. योगेंद्र यादव सांगत फिरतात मी भारत जोडो यात्रा काढतो आहे अन् कॉँग्रेस माझ्यासोबत आहे,’’ असा टोला चव्हाण यांनी लगावला. मध्यंतरी चव्हाण यांनी गांधी कुटुंबीयांवर निशाणा साधला होता. त्याबाबत खुलासा करताना त्यांनी मी कधीही कॉँग्रेस पक्ष सोडणार नाही असे नमूद केले.

चव्हाण म्हणाले की, ‘‘माझ्याविरोधात प्रतिक्रिया याव्यात यासाठी पक्षाच्या मुख्यालयात बसलेले काही नेते कामाला लागले आहेत. या सगळ्या नेत्यांवर मोदींची छाप आहे, पक्षाची घसरण व्हायला तेच कारणीभूत आहेत. माझी भूमिका स्पष्ट आणि पक्ष हिताची आहे. पक्षात घटनेप्रमाणेच कार्यकारिणीच्या निवडणुका झाल्यात असे म्हणणाऱ्या नेत्यांसोबत मी टीव्हीवर खुली चर्चा करायला तयार आहे. गुलाम नबी आझाद हे पक्ष सोडून बाहेर पडले असले तरी ते देशव्यापी राजकारण करणार नाहीत. त्यांचा पक्ष केवळ जम्मू काश्मीरपुरताच मर्यादित असेल.’’

पदयात्रेमध्ये नऊ मराठी चेहरे

काँग्रेसच्या पदयात्रेतसाठी ११८ पदयात्रींची निवड केली आहे. ३५०० किलोमीटरच्या मार्गात हे ११८ जण सलग पाच महिने चालणार आहेत. त्यात महाराष्ट्रातून मनोजकुमार उपाध्याय, पिंकी राजकुमार सिंह, आतिशा पैठणकर, महिंद्रसिंह व्होरा, वैष्णवी भारद्वाज, कॅप्टन सत्यम ठाकूर, रोशनलाल बिट्टू, डॉ. श्रावण रापणवार आणि नंदा म्हात्रे या नऊ जणांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT