Rahul Gandhi and Akhilesh Yadav  
देश

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Rahul Gandhi and Akhilesh Yadav rally: अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला.

कार्तिक पुजारी

लखनऊ- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची आज प्रयागराजच्या फूलपूर येथे सभा नियोजित होती. पण, त्यांच्या सभेमध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्यांना भाषण न करताच तेथून काढता पाय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ते बॅरिकेड तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे परिस्थिती ओळखून भाषण न करताच दोन्ही नेते तेथून निघून गेले.

गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर नेत्यांच्या सल्ल्याने राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी तेथून भाषण न करता निघण्याचा निर्णय घेतला.

फूलपूरमध्ये इंडिया आघाडीची सभा होती. त्यासाठी राहुल गांधी आधीपासूनच व्यासपीठावर उपस्थित होते, काही वेळाने अखिलश यादव त्याठिकाणी आले. त्यानंतर समोर असलेले कार्यकर्ते पुढे सरकले. त्यांच्यासमोर बॅरिकेड होते, पण त्यांनी बॅरिकेड तोडून पुढे येण्यास सुरुवात केली. त्यांना पुढे न येण्याचं आवाहन करण्यात आले, पण कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडले अन् ते व्यासपीठाच्या जवळ येऊन पोहोचले.

अखिलेश यादव यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाले की, 'आम्ही आमचं म्हणणं तुमच्यापुढे ठेवण्यासाठी आलो आहे. आम्हाला कल्पना आहे की, तुम्ही उत्साही आहात. असाच उत्साह तुम्हाला मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवायचा आहे. मागे देखील मी आलो होते पण मला माझं म्हणणं तुमच्यापुढे मांडण्याची संधी मिळाली नव्हती. तरी तुम्ही सपाला मतदान केलं.'

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकूण ७ टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे. त्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. यावेळी एकूण ४९ मतदारसंघामध्ये मतदान होईल. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेढीत कैद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT