Sakal podcast E sakal
देश

Sakal Podcast : नवाब मलिकांना जामीन ते राहुल गांधींचा मोदींवर पलटवार

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते, रोजच्या सकाळ पॉडकास्टमध्ये

स्वाती केतकर-पंडित

सकाळ पॉडकास्टमध्ये दररोज देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. तुम्ही सकाळ अॅपवर सकाळ पॉडकास्ट ऐकू शकता किंवा इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता.

आजच्या पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. अखेर नवाब मलिक यांना जामीन मंजूर, अजित पवार गटात जल्लोष

२. राजद्रोहाचा कायदा रद्द, इंग्रजांच्या काळातल्या कायद्यांमध्ये बदल

३. झेंडावंदनाच्या यादीवरून राज्याच्या मंत्रीमंडळात नाराजी

४. किशोरी पेडणेकरांच्या अडचणी वाढणार

५. ४७ वर्षांनंतर रशियाची मोठी चांद्रमोहीम; 'लूना-२५'चं यशस्वी प्रक्षेपण!

६. अभिनेत्री जया प्रदा यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा,

७. आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या महिलांनी पटकाविली सहा सुवर्णपदके

८. मोदींना मणिपूर जाळायचं आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

दीड वर्ष तुरुंगात काढल्यानंतर अखेर नवाब मलिक यांना जामीन मिळाला आहे, अजित पवार गटाला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाल्याचे मान्य केल्यानेच हा जामीन मिळाल्याची चर्चा आहे. अमित शहा यांनी लोकसभेत कायद्यातील बदलासंबंधी विधेयकं सादर केली. त्यानुसार आता राजद्रोहाचा कायदा बदलण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिन ३ दिवसांवर येऊन ठेपला असता आपापल्या जिल्ह्यात ध्वजवंदन कुणी करायचं, याबद्दल मंत्र्यांमध्ये वाद आहेत.

तर वेगवान घडामोडींत ऐकूया, किशोरी पेडणेकरांना ईडीची नोटीस, रशियाच्या लूना-२५ या चांद्रयानाचं प्रक्षेपण, अभिनेत्री-खासदार जयाप्रदांना ६ महिन्यांचा तुरुंगवास आणि आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नागपूरच्या खेळाडूंचे यश.

चर्चेतल्या बातमीत ऐकूया राहुल गांधींनी मोदींच्या संसदेतील भाषणाचा घेतलेला समाचार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT