Crime News Esakal
देश

Crime News: आईने मुलासोबत मिळून पोटच्या लेकीला जिवंत जाळलं; धक्कादायक कारण आलं समोर...

एका मुलीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

जन्मदात्या आईने भावाने मुलीला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मुलगी लग्नाआधी गरोदर राहिल्यानंतर तिच्या भावाने आणि आईने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत मुलगी 70 टक्के भाजली. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

ही संपूर्ण घटना बहादुरगड पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणीचे तिच्या गावातील एका तरुणासोबत संबंध होते. दरम्यान, मुलगी गरोदर राहिली. घरच्यांना हा प्रकार कळताच ते संतापले. जेव्हा त्यांनी तिची चाचणी केली तेव्हा गर्भधारणेची बातमी खरी ठरली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला जंगलात नेले आणि जिवंत जाळण्याच्या उद्देशाने तिच्या पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले.

या घटनेत मुलीची आई आणि भावाचा हात असल्याचा आरोप आहे. त्यांनी मुलीवर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून दिले. त्यामुळे ती 70 टक्के भाजली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आगीत गंभीररीत्या भाजलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे.

आई आणि भाऊ दोघांना अटक

मुलीची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. सध्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी आई आणि भावाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध कलम 307 (हत्येचा प्रयत्न) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजकुमार अग्रवाल म्हणाले - बहादूरगड पोलिस स्टेशन हद्दीतील नवादा खुर्द गावात एका मुलीला तिच्या कुटुंबीयांनी जाळून मारण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, संबधित घटनेची कायदेशीर कारवाई केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी घडली. आई आणि भावाने मिळून मुलीला जिवंत जाळले. याआधी तिला जबर मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिस आधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT