Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE  
देश

MP New CM News : शिवराज सिंह की नवा चेहरा, मध्यप्रदेशात मुख्यमंत्री कोण होणार? आज होणार फैसला

विधानसभा निवडणूक 2023 मध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर मध्य मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित कणसे

नविधानसभा निवडणूक 2023 मध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर मध्य मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शिवराज सिंह चौहान यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होत की छत्तीसगढ सारखं नव्या नेत्याला संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

छत्तीसगडनंतर आता सर्वांच्या नजरा मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे लागल्या आहेत. मध्य प्रदेशात नवा मुख्यमंत्री आज (सोमवारी), तर राजस्थानमध्ये मंगळवारी ठरणार आहे. मध्यप्रदेशसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण आणि पक्ष सचिव आशा लाकरा सोमवारी सकाळी 11 वाजता भोपाळला पोहोचण्याची शक्याता आहे.

त्यानंतर आमदारांशी चर्चेची फेरी सुरू होईल. दुपारी एक वाजता जेवणासाठी बोलावण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याचा निर्णय होईल. त्याचवेळी राजस्थानचे निरीक्षक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सरोज पांडे आणि विनोद तावडे हे मंगळवारी जयपूरला पोहोचून आमदारांशी चर्चा करतील अशी शक्यता आहे.

यापूर्वी पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पक्षाच्या विजयाबद्दल शिवराज यांचे अभिनंदन केले. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रातून काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचनाही आमदारांना देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या कोणत्याही आमदाराने आपल्या सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करण्याची विनंती करू नये, असे त्यात म्हटले आहे. याशिवाय बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये वक्तव्ये देण्याचे टाळण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री कोण होणार हे आज संध्याकाळपर्यंत ठरणार आहे. शिवराज यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं यासठी बैतूल जिल्ह्यात अनुष्ठान करण्यात आले आहे, जिल्ह्यातील 130 गावांतील किरार समाजातील लोकांच्या घरी सुंदरकांड पठण केले जात आहे. हे 13 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

छत्तीसगढमध्ये 13 तारखेला शपथविधी

छत्तीसगडचे नवे मुखयमंत्री म्हणून विष्णुदेव साय 13 डिसेंबरला शपथ घेणार आहेत. रायपुरच्या सायन्स कॉलेज मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

साय यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. दरम्यान उत्तर प्रदेश प्रमाणे छत्तीसगढ मधेही 2 उपमुख्यमंत्री नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT