GST Sakal
देश

सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी वसुलीत घट

जीएसटीची वसुली सलग तिसऱ्या महिन्यात घटली आहे. जूनमध्ये सरकारला जीएसटीपोटी केवळ ९२८४९ कोटी रुपये मिळाले आहेत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - जीएसटीची वसुली (GST Recovery) सलग तिसऱ्या महिन्यात घटली आहे. जूनमध्ये सरकारला (Government) जीएसटीपोटी केवळ ९२८४९ कोटी रुपये मिळाले आहेत. कोरोनामुळे (Corona) राज्यांमध्ये लांबलेली लॉकडाउनसदृश (Lockdown) स्थिती आणि निर्बंधांमुळे आर्थिक उलाढालींना पर्यायाने जीएसटी वसुलीला फटका बसल्याने डिसेंबरपासूनची आतापर्यंतची सर्वात नीचांकी महसूल (Revenue) मिळाला आहे. (Decline in GST Collection for Third Consecutive Month)

जूनमध्ये मिळालेल्या ९२८४९ कोटी रुपये जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटीचा हिस्सा १६४२४ कोटी रुपये, राज्यांच्या जीएसटीचा हिस्सा २०३९७ कोटी रुपये, तर आयजीएसटीचा हिस्सा ४९०७९ कोटी रुपये एवढा आहे. यामध्ये, आयातीवरील जीएसटी वसुलीतून मिळालेल्या २५७६२ कोटी रुपयांचाही समावेश आहे. याखेरीज सरकारला ६९४९ कोटी रुपयांचा अधिभारही प्राप्त झाला आहे. ही आकडेवारी ५ जून ते ५ जुलैपर्यंत झालेल्या जीएसटी वसुलीची असल्याचे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना जूनमध्ये विवरणपत्र सादरीकरणात १५ दिवसांपर्यंतच्या विलंबासाठी दिलेली सवलत हे त्यामागचे कारण असल्याचेही अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT