Delhi Girl Accident esakal
देश

Delhi Girl Accident : अपघातानंतर अंजली घरी गेली होती; मैत्रिणीच्या जबाबाने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

Death of Anjali Singh in New Delhi

नव्या वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहाटे दिल्लीमध्ये पुन्हा एक हादरवून सोडणारी घटना घडली. एका तरुणीला कारने १३ किलोमीटर फरफटत नेलं. कारमध्ये पाच जण होतं. ही कार वेगवेगळ्या चार पोलिस ठाण्यांसमोरुन गेली पण कुणालाही पत्ता लागला नाही. घटनेमध्ये पीडित तरुणीचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला.

या प्रकरणामध्ये आता मृत अंजलीच्या मैत्रिणीने माहिती दिली आहे. पोलिसांनी या तरुणीचा जबाब नोंदवला आहे. ही मैत्रीण सीसीटीव्ही फुटेजमध्ये हॉटेलबाहेर दिसली होती. हीच तरुणी स्कुटीवर अंजलीसोबत होती.

हेही वाचाः ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

मीडिया रिपोर्टनुसार, मृत अंजलीची मैत्रीण निधीने सांगितलं की, संपूर्ण चूक ही कार चालकांची होती. कारने धडक दिल्यानंतर अंजली घाबरली होती. धडकेनंतर ती कारच्या बाजूला पडली. स्कुटीवरुन पडल्यानंतर अंजलीला किरकोळ जखम झाली. त्यानंतर ती उठून घरी गेली.

अंजलीची मैत्रीण निधी हिच्या जबाबाकडे अत्यंत गांभीर्याने बघितलं जातंय. अपघात झाला, हा मुद्दा दिल्ली पोलिस घटनेच्या पहिल्या दिवसापासून सांगत आहे. परंतु आता निधीचा जबाब आणि आरोपींचा जबाब पडताळून पाहिला जात आहे. अंजलीच्या पीएम रिपोर्टमध्ये तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येतंय. मात्र याबाबतची पुष्टी झालेली नाही.

ज्या कारने पीडित मृत तरुणीला फरफटत नेलं, ती कार काही तासांपूर्वीच आरोपींनी एका मित्राकडून घेतली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुराव्यांवरुन टाईमलाईन बनवण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी आरोपींना घटनास्थळी घेऊन जावं लागले. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आरोपींवर कलम वाढवली जाणार आहेत.

ही घटना १ जानेवारी रोजी पहाटे २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी पोलिसांना एक स्कुटी आणि बुट मिळाला होता. ही स्कुटी रेखा नावाच्या महिलेच्या नावावर होती. तिने ही स्कुटी पाच वर्षांपूर्वीच विकलेली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT